Photos …तर क्रिकेटर नाही, मच्छीमार झाले असते सुनील गावस्कर; पाहा फोटो
shruti letsupp
Sunil Gavskar
टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांचा आज 74 वाढदिवस आहे. त्यांच्या नावावर डेब्यू टेस्ट सीरीजमध्ये सर्वाधिक रन करण्याचे रोकॉर्ड आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना लिटील मास्टर म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड केले. ज्याची उदाहरण आजही दिली जातात.
सुनील गावस्कर यांच्या जीवनातील एक किस्सा आहे. जो अनेकांना माहिती नाही. त्यांचा जन्म जाला तेव्हा दवाखान्यात एक घटना घटली होती. त्यामुळे ते क्रिकेटर नाही तर थेट मच्छीमार झाले असते. असं सांगितलं जात.
त्यांचं आत्मचरित्र सनी डेज या पुस्तकात त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हा माझे नन-काका दवाखान्यात त्यांना पाहण्यासाठी आले होते. तेव्हा माझ्या कानाला एक जन्मखून होती. मात्र ते दुसऱ्या दिवशी आले तेव्हा जे बाळ त्यांनी जवळ घेतलं त्याला ती जन्मखून नव्हती.
त्यानंतर माझा शोध घेतला गेला. तेव्हा मी एका मच्छिमार स्त्रीजवळ होतो. नर्सने चुकीने मला त्या स्त्री जवळ झोपवले होते. त्यामुळे त्या दिवशी काकांनी पाहिलं नसतं तर मी मच्छिमार असतो.