IND vs AUS ODI : ‘या’ भारतीय फलंदाजांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा
letsupteam
Untitled Design
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टर-ब्लास्टरने कांगारूंविरुद्ध 44.59 च्या सरासरीने 71 सामन्यांत 3307 धावा केल्या आहेत.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 40 सामन्यांत 61.33 च्या सरासरीने 2208 धावा केल्या आहेत.
या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 43 एकदिवसीय सामन्यांमध्ये 54.81 च्या सरासरीने 2083 धावा केल्या आहेत.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी चौथ्या स्थानावर आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1660 धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीची फलंदाजीची सरासरी 44.86 राहिली आहे.
शिखर धवनचा टॉप-5 मध्ये समावेश आहे. धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 45.17 च्या फलंदाजीच्या सरासरीने 1265 धावा केल्या आहेत.