विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे.
या दरम्यान आजच्या शिवजयंतीनिमित्त छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता विकी कौशलने रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
रायगडाला दिलेल्या भेटीचे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंना कॅप्शन देताना व्यक्तीने म्हटले की, माझं भाग्य आहे की, मला शिवजयंतीनिमित्त रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करता आलं.
पुढे तो म्हणाला, इथं येण्याची माझी पहिली वेळ होती. तसेच शिवजयंतीनिमित्त रायगडावर येणं महाराजांचे आशीर्वाद मिळवण्याची ही एक अत्यंत खास संधी आहे. असेही तो म्हणाला.
तसेच यावेळी विकी कौशलने सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
दरम्यान छावा चित्रपटाची सध्या सुरू असलेली विक्रमी घोडदौड पाहता चहात्यांनी विकीला पाहण्यासाठी तोबा गर्दी केली तर पाहायला मिळालं.
त्यावेळी रायगडावर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विकी कौशलला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देत सत्कार केला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले असून, थिएटरमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.