Download App

अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय! मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला कोर्टाचा दणका

  • Written By: Last Updated:

26/11 accused Tahawwur Rana set to be sent to India : अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय झाला असून, 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आल आहे. राणाविरोधात भारताने पुरेसे पुरावे सादर केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Video : नव्या वर्षात काका-पुतणे एकत्र येणार? अजितदादांच्या आई म्हणाल्या, “सगळे वाद..”

मुंबईतील ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप

२६/११च्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राणाच्या नावाचा समावेश चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य असल्याचा आणि मुंबईतील ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप आहे.

तहव्वूर राणा आणि त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडली यांनी मिळून मुंबई हल्ला यशस्वी करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली होती. राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे. अमेरिकेत राणाला त्याच्यावरील आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे, परंतु भारताच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेमुळे त्याची तुरुंगातून सुटका झालेली नाही.

फक्त 14 दिवसांत 2 राष्ट्रपती बदलले, ‘या’ देशात मोठं राजकीय संकट; वाचा नेमकं काय घडलं?

एनआयएच्या आरोपपत्रात काय?

एनआयएने दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात हेडली, राणा, हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी, इलियास काश्मिरी, साजिद मीर, अब्दुर रहमान हाशिम सय्यद, मेजर इक्बाल आणि मेजर समीर अली यांची नावे आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी लष्कर-ए-तैयबा आणि हुजीच्यावतीने महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करून योजना आखली. यात मुंबईत झालेल्या 26/11 च्या ठिकाणांचाही समावेश आहे.

follow us