Download App

Turkey Earthquake : तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप

नवी दिल्ली : तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे (Turkey Earthquake) जोरदार धक्के जाणवले. नूरदगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (Richter scale) 7.8 इतकी मोजली गेली. यादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. हा आकडा अजून वाढू शकतो. मात्र, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता 7.5 एवढी ठेवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के सीरियापर्यंत दूरपर्यंत जाणवले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे 04:17 वाजता भूकंप झाला आणि त्याची खोली जमिनीच्या आत 17.9 किलोमीटर होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपामुळे अनेक जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

या शक्तिशाली भूकंपानंतर 10 मिनिटांनी 6.7 रिश्टर स्केलचा आणखी एक जोरदार हादरा जाणवला. सोशल मीडियाच्या वृत्तानुसार भूकंपामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. यासोबतच अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे.

या भूकंपानंतर सीरिया, इस्रायल, लेबनॉन, इराक, इस्रायल, पॅलेस्टाईन, अगदी सायप्रसमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.सोशल मीडियावर जे व्हिडिओ येत आहेत, त्यात भूकंपामुळे इमारती कशा हादरत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे.

गेल्या आठवड्यातही तुर्की-इराण सीमेवर भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी होती. गेल्या आठवड्यात, तुर्कीच्या सीमेजवळ वायव्य इराणमध्ये 5.9-रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यात दोन लोक ठार आणि 12 जण जखमी झाले होते.

Tags

follow us