Download App

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंगा

World Bank President Ajay Banga: मास्टरकार्डचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष असतील. जागतिक बँकेच्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने आज (बुधवारी) अजय बंगा यांची 2 जूनपासून लागू होणार्‍या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली. अजय बंगा हे जागतिक बँकेचे प्रमुख होणारे भारतीय-अमेरिकन आणि अमेरिकन शीख समुदायातील पहिले व्यक्ती असतील.

अजय बंगा हे जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची जागा घेतील. बंगा (६३) यांना अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी फेब्रुवारीच्या अखेरीस या पदासाठी नामांकन दिले होते. या जागतिक संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी अजय बंगा हे सर्वात योग्य व्यक्ती असल्याचे बिडेन म्हणाले होते. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या उमेदवारीला भारतानेही पाठिंबा दिला होता.

Cyclone Mocha : बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ धडकणार…

अजय बंगा हे हैदराबाद पब्लिक स्कूलचा (एचपीएस) विद्यार्थी आहेत. बंगा यांनी त्यांचे शालेय शिक्षण 1970 च्या दशकात एचपीएसमध्ये केले. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा हे लष्करी अधिकारी होते. 1976 मध्ये एचपीएसमधून उत्तीर्ण झालेल्या बंगा यांनी सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात बॅचलर पदवी आणि त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून पीजीपी केले. 1981 मध्‍ये नेस्ले सोबत व्‍यवसाय करिअरची सुरूवात करून, बंगा 2010 मध्‍ये मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि सीईओ बनले. गेल्या वर्षी ते जनरल अटलांटिकचे उपाध्यक्ष झाले. आता ते जागतिक बँकेचे अध्यक्ष झाले आहेत.

Tags

follow us