America Iran War : आखातातील युद्धाबाबत मोठी अपडेट, इराणमधून अमेरिकी सैन्य माघार घेणार…

अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्ध थांबण्याच्या वाटेवर असून इराणमधून अमेरिकी सैन्य माघार घेणार असल्याची अपडेट समोर आलीयं.

Untitle (54)

Untitle (54)

America Iran War : मागील काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण देशात घमासान सुरु आहे. कुठल्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता असतानाच आता या युद्धाबाबत (America Iran War) एक मोठी अपडेट समोर आलीयं. इराणच्या हद्दीतून अमेरिकेच्या लष्कराने (सैन्य) माघार घेणार असल्याची माहिती समोर आलीयं.

अमेरिकन वृतसंस्थेच्या माहितीनुसार ओमान आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांसमोर एक ‘शांतता मसुदा’ ठेवण्यात आला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव थांबवून चर्चेच्या टेबलवर यावे, यासाठी जागतिक पातळीवरून प्रचंड दबाव आणला जात आहे. शांतता मसुद्यात प्रामुख्याने ३ टप्प्यांचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. मात्र, वरवर शांततेचा वाटणारा हा शांतता मसुदा प्रत्यक्षात अंमलात आणणे दोन्ही देशांसाठी अग्नीपरीक्षेपेक्षा कमी नसणार आहे.

शांतता मसुद्यात नेमकं काय?

-60 दिवसांच्या युद्धविरामादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांवर आणि एकमेकांच्या लष्करी तळांवर सुरू असलेले थेट हल्ले तातडीने थांबवायचे आहेत. या ६० दिवसांच्या कालावधीत दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी शांतता करारासाठी एकत्र बसतील.
-‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ खुले करणे आणि नाकेबंदी हटवणे…
इराणने आंतरराष्ट्रीय खनिज तेल व्यापाराची जीवनवाहिनी असलेल्या ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’मधील नाकेबंदी हटवावी. त्या बदल्यात अमेरिकेने इराणच्या बंदरांभोवती घातलेली आर्थिक आणि लष्करी नाकेबंदी पूर्णपणे हटवायची आहे.
-गोठवलेला निधी आणि आर्थिक निर्बंधांतून दिलासा
अमेरिकेच्या दबावामुळे विविध आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये गोठवून ठेवलेला इराणचा अब्जावधी डॉलर्सचा निधी टप्प्याटप्प्याने मोकळा केला जाईल आणि इराणवरील जाचक आर्थिक निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.

पत्रकार परिषदेत हसली, आता घरीच बसली; ‘विजय’ सरकारकडून IPS रम्या भारतीचं थेट निलंबन…

दरम्यान, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, हा शांतता मसुदा जेवढा सोपा दिसतोयं तितकाच राबवणे अवघड आहे.दोन्ही देशांमधील प्रचंड अविश्वासामुळे या करारात मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. 60 दिवसांच्या युद्धविरामाचा फायदा घेऊन इराणचे सैन्य पुन्हा संघटित होतील. तर दुसरीकडे, इराणला भीती आहे की आपण शांत झाल्यावर अमेरिका पुन्हा दगाफटका करेल.

‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ हे इराणचे सर्वात मोठे हुकुमी पान आहे. जर इराणने हा मार्ग आधीच खुला केला, तर अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही ताकद उरणार नाही. त्यामुळे ‘आधी लष्कर मागे कोण घेणार?’ यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे पडद्यामागे या शांतता मसुद्यावर वाटाघाटी सुरू असल्याचा दावा ‘रॉयटर्स’ने केला असतानाच दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कमी झालेला नाही. नुकतेच हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणच्या संशयास्पद हालचालींवरून अमेरिकन नौदलाने थेट कारवाई केली होती.

Exit mobile version