Download App

अदानीला समूहाला आणखी एक मोठा झटका; केनियातील मोठी आंतरराष्ट्रीय डील रद्द

अदानी समूहाला (Adani Group) केनियामध्ये विद्युत वाहिन्या उभारण्याचे एक कंत्राट मिळाले होते. त्यासाठी केनिया सरकारबरोबर करारही झाला होता.

  • Written By: Last Updated:

Gautam Adani: देशातील मोठा उद्योग समूह असलेल्या अदानीचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिकेत गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला जात आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानी आणि केंद्र सरकारला घेरलंय. त्यात आता अदानी समुहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक झटका बसला आहे. केनिया (Kenya) सरकारने अदानीबरोबर सुमारे सातशे दशलक्ष डॉलर्स किंमतीचा करार रद्द केला आहे.

गौतम अदानींच्या अडचणीत वाढ; यूएसमध्ये लाचखोरी आणि फसवणूकीचे आरोप, अटक वॉरंट जारी

स्वतः केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी गुरुवारी केली आहे. केनियातील मुख्य विमानतळाचा विस्तार करण्याची योजना होती. त्यासाठी अदानी समुहाबरोबर करार होणार होता. पण ही योजनाच आता रद्द करण्यात आली आहे. अदानी समूहाला केनियामध्ये विद्युत वाहिन्या उभारण्याचे एक कंत्राट मिळाले होते. त्यासाठी केनिया सरकारबरोबर करारही झाला होता. परंतु अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणात अदानी हे अडचणीत आल्यानंतर केनियाचे राष्ट्राध्यक्ष रुटो यांनी निर्णय जाहीर करताना सांगितले की मी परिवहन मंत्रालय आणि ऊर्जा आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत यंत्रणांना सध्या सुरू असलेला करार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तपास यंत्रणा आणि भागीदार देशांनी प्रदान केलेल्या नवीन माहितीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आलाय.

अतुल सावेंनी निवडणुकीत पैसे वाटले, इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, थेट व्हिडिओच दाखवले…


नेमकी करार काय होता ?

अदानी एनर्जी सोल्युशन्सने केनिया इलेक्ट्रिकल ट्रान्शमिशन कंपनीमध्ये 736 दशलक्ष डॉलर किमतीचा सार्वजनिक-खासगी भागीदारी करार केला होता. हा करार 30 वर्षांचा होता. याबाबत काही कायदेशीर मुद्दे उपस्थित झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात न्यायालयाने करार स्थगितीचे आदेश दिले होते.


अदानी व सात जणांवर लाचखोरीचा आरोप

भारतातील अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि इतर सात जणांवर अमेरिकेत (US) मोठ्या प्रमाणात लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे वृत्त रॉयटर्स आणि ब्लूमबर्ग यांनी 21 नोव्हेंबर रोजी दिले होते. या अहवालानुसार अदानी समूहाने सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली. गौतम अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांनी कंत्राट मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आलाय.यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. त्याच्यासोबत त्याचा पुतण्या सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जीचे अधिकारी आणि अझुरे पॉवर ग्लोबल लिमिटेड ​​सिरिल कॅबनेस यांनाही आरोपी करण्यात आले आहे. हे आरोप अदानी समूहाने फेटाळून लावले आहे.

follow us