Arsyan Ismail Sold 300rs Ai Dot Com Domain : नमस्कार मित्रांनो!, आज आपण अशी एक भन्नाट स्टोरी पाहणार आहोत, जी ऐकून तुम्ही म्हणाल अरे, हे खरंच घडलं का? कारण ही गोष्ट आहे फक्त 300 रुपयांच्या गुंतवणुकीची… आणि तब्बल 634 कोटींच्या परताव्याची! होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. मलेशियातील टेक उद्योजक Arsyan Ismail यांनी 1993 साली, वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी AI.com हे डोमेन विकत घेतलं. किंमत किती? फक्त 100 डॉलर… म्हणजे त्या काळात साधारण 300 रुपये! आता थोडं मागे जाऊया. 1993 मध्ये इंटरनेट म्हणजे काय, हेही अनेकांना नीट माहित नव्हतं. सोशल मीडिया नव्हता, यूट्यूब नव्हतं, स्मार्टफोन नव्हते. डोमेन नेम म्हणजे फक्त एक वेब अॅड्रेस. पण या 10 वर्षांच्या मुलाने AI.com हे नाव घेतलं.
का घेतलं? तर त्यामागचं कारण होतं AIही त्याच्या नावाची पहिली दोन अक्षर होती. त्यावेळी Artificial Intelligence हा शब्द ट्रेंडमध्ये नव्हता. AI म्हणजे आजसारखी क्रांती नव्हती. मात्र एक छोटं, शॉर्ट आणि क्लीन डोमेन म्हणून त्याने ते विकत घेतलं. कदाचित त्याला देखील याची कल्पना नसेल कि भविष्यात ही दोन अक्षरं जग बदलणार आहेत. आणि मग 2020 नंतर काय झालं? तर AI क्रांती सुरू झाली. चॅटबॉट्स, ऑटोमेशन, मशीन लर्निंग, मोठमोठ्या टेक कंपन्यांची अब्जावधींची गुंतवणूक या सगळ्यांमुळे AI हा शब्द सोन्याचा झाला, आणि मग 2025 मध्ये आली ती ऐतिहासिक डील.
Arsyan Ismail यांनी AI.com हे डोमेन 70 मिलियन डॉलरमध्ये म्हणजेच भारतीय रुपयात अंदाजे 634 कोटी रुपयांना विकलं. या डोमेनची खरेदी केली ती Kris Marszalekयांनी, जे Crypto.comया मोठ्या क्रिप्टो प्लॅटफॉर्मची CEO आहेत. या सगळ्ययांत खास गोष्ट म्हणजे, या डिलचं संपूर्ण पेमेंट हे क्रिप्टोकरन्सीमध्ये करण्यात आलं आहे. याला असं देखील म्हणता येत डिजिटल डोमेन प्लस डिजिटल करन्सी म्हणजेच फ्युचरिस्टिक डील. असं म्हटलं जातं की, ही आतापर्यंतची सार्वजनिकरित्या नोंदवलेली सर्वात महाग डोमेन विक्री आहे. याआधी 2010 मध्ये CarInsurance.com हे डोम 49.7 मिलियन डॉलरला विकलं गेलं होतं. मात्र AI.com ने तो रेकॉर्ड आता मोडलाय.
लेट्सअप मराठीचं वृत्त सत्यचं; भाजपा प्रवक्त्याची दिवाळखोरी, नेटकऱ्यांनी धू-धू धुतला
या घटनेतील मोठा ट्विस्ट म्हणजे AI.com हे डोमेन जगासमोर झळकले ते Super Bowl LX दरम्यान, सुपर बाउल म्हणजे जगातील सर्वात मोठ्या क्रीडा इव्हेंट्सपैकी एक. तेथील जाहिरातीत AI.com दिसलं आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. यानंतर Crypto.com ने AI.com वर एजंटिक AI प्लॅटफॉर्म लॉन्च केला. म्हणजे एक पर्सनल AI एजंट जो मेसेज पाठवू शकतो, स्टॉक्स ट्रेड करू शकतो, अॅप्स हाताळू शकतो.
आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा हे डोमेन विक्रीसाठी आलं, त्यावेळेस Arsyan Ismail यांना 100 मिलियन डॉलरपर्यंत ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र त्यांनी 70 मिलियन डॉलरवर डील फायनल केली. याबाबत ते म्हणाले की, कधी कधी घासाघीस केल्याने डील हातातून जाऊ शकते, त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. योग्य वेळेची वाट पाहणं ही देखील एक कला आहे.
10 वर्षांच्या मुलाने घेतलेला 300 रुपयांचा निर्णय 30 वर्षांची 634 कोटींमध्ये बदलतो. ही फक्त एक स्टोरी नाहीये, तर ही डिजिटल युगातील संयम आणि व्हिजनचे ताकद आहे. तुम्हाला काय वाटत, आज जर तुम्हाला एखादं छोटं मात्र युनिक डोमेन घ्यायची संधी मिळाली, तर तुम्ही घ्याल का?
