ढाका : बांगलादेशातील ढाका येथील इमारतीत झालेल्या स्फोटात किमान 7 जण ठार, 70 हून अधिक लोक जखमी झालीची माहिती समोर आली आहे. याबाबत बांग्लादेशातील स्थानिक मीडियाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ढाका येथील बाजारपेठेत मंगळवारी ही आग लागली, असे स्थानिक अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार की, स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नाही. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.
आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. हा धक्कादायक प्रकार दुपारी 4.50 च्या सुमारास घडला आहे. पोलिस स्टेशनचे निरीक्षक बच्चू मिया यांनी सांगितले आहे की, जखमींना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
या सर्व जखमींवर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत आणि त्याच्या शेजारी BRAC बँकेची शाखा आहे. स्फोटात रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधींनी उल्लेख केलेली मुस्लिम ब्रदरहुड आहे तरी काय? जाणून घ्या
पोलीस निरीक्षक बच्चू मिया यांनी एएफपीला सांगितले की, किमान ४५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. उर्वरित जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.