Bolivia Plane Crash Army plane loaded with notes crashes! 15 dead, 30 injured : बोलिव्हिया या देशाची राजधानी पाज या ठिकाणी मोठा विमान अपघात झाला आहे. हे विमान सैन्याचं होतं. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश भरलेली होती. यामध्ये जवळपास 15 लोकांचा मृत्यू आणि 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
सुनेत्रावहिनींचे व्हिडिओ व्हायरल केल्यास कायदेशीर कारवाई करू; रूपाली ठोंबरेंचा इशारा
या अपघातानंतर हळहळ व्यक्त केले जात आहे.मात्र दुसरीकडे नोटांनी भरलेल्या या विमानाचा अपघात झाल्यानंतर या ठिकाणी नोटा जमा करण्यासाठी लोकांची गर्दी उसळल्याचे देखील समोर आलं आहे.
HUGE MILITARY PLANE CRASHES IN EL ALTO, BOLIVIA pic.twitter.com/QVlyg63RpX
— RT (@RT_com) February 27, 2026
बोलिव्हियन एअर फोर्सचं हर्क्युलस एअरक्राफ्ट हे विमान नव्या प्रिंट केलेल्या नोटा वाहून नेत होतं. मात्र राजधानी पाजच्या जवळ आल्यानंतर हे विमान कोसळलं. हा अपघात खराब हवामानामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर विमानासह संबंधित परिसर प्रचंड नुकसानग्रस्त झाला आहे.
पाकिस्तानची अफगान विरूद्ध युद्धाची घोषणा! पाकच्या एअर स्ट्राईकला तालिबानचं आक्रमक उत्तर
एकीकडे असा हा संवेदनशील अपघात झालेला असताना दुसरीकडे मात्र कॅश वाहून नेत असलेल्या विमानातील कॅश बाहेर पडल्याने लोकांनी हे पैसे गोळा करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी हटवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना पाण्याचा वापर करावा लागला. या अपघातानंतर एल अल्टो इंटरनॅशनल विमानतळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते.
