Download App

अनुरा दिसानायके होणार श्रीलंकेचे राष्ट्रपती; आर्थिक सुधारणा करण्याचे मोठे चॅलेंज, भारताशी संबंध कसे राहणार?

Anura Kumara Dissanayake : श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Sri Lankan Presidential Election) मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके

  • Written By: Last Updated:

Anura Kumara Dissanayake : श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Sri Lankan Presidential Election) मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके (Anura Kumara Dissanayake) यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, हा विजय आपल्या सर्वांचा आहे. त्यांनी या निवडणुकीत नमल राजपक्षे, साजिद प्रेमदासा आणि रानिल विक्रमसिंघे या तीन उमेदवारांचा पराभव केला आहे.

दिसानायके यांनी सरकार विरोधात होत असलेल्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली होती. दिसानायके चीनचे समर्थक मानले जात असल्याने भारताबाबत ते काय भूमिका घेणार याकडे आता जगाचे लक्ष लागून आहे. राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना 42.31 टक्के मते मिळाली तर त्यांचे विरोधी पक्षनेते सजीथ प्रेमदासा यांना 32.76 टक्के मते मिळाली होती.

तर दुसरीकडे देशाच्या आर्थिक संकटानंतर अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेले अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांनी आपला पराभव स्वीकारलेला नाही. मात्र परराष्ट्र मंत्री अली साबरी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, दिसानायके यांनी निवडणूक जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे मी रानिल विक्रमसिंघे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता मात्र जनतेने वेगळा निर्णय घेतला ज्याला मी स्वीकारत आहे. 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती सचिवालयात दिसानायके यांचा शपथविधी होणार असल्याचे श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

आर्थिक मुद्द्यांचे वर्चस्व

माहितीनुसार या निवडणुकीत आर्थिक मुद्द्यांचे वर्चस्व होते. गेल्या दोन वर्षात सर्वात वाईट आर्थिक टप्प्याचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या जनतेने या निवडणुकीत सर्वाधिक महत्त्व आर्थिक मुद्याला दिले. तर IMF सोबत झालेल्या डीलवर दिसानायके यांच्या पक्षाने सांगितले की, आम्ही डील मोडणार नाही मात्र यावर चर्चा नक्कीच करणार. या निवडणुकीत आम्ही आयकर कमी करण्याचे आश्वासन दिले होते तसेच अन्न आणि औषधांवरील करही कमी करणार असं पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

कोण आहे अनुरा कुमारा दिसानायके?

दिसानायके यांचा जन्म थम्बुटेगामा येथे झाला. ते त्यांच्या गावातील पहिले विद्यार्थी होते ज्याला विद्यापीठात जाण्याची संधी मिळाली. त्यांनी 80 च्या दशकात विद्यार्थी राजकारणाला सुरुवात केली तर 1987 ते 1989 दरम्यान सरकारविरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी JVP मध्ये सामील झाले. तर 2000 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले आणि 2004 मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले मात्र काही मतभेदानंतर त्यांनी 2005 मध्ये कृषी आणि पाटबंधारे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

तिरुपती लाडू वाद : चंद्राबाबू नायडूंची मोठी घोषणा, सर्व मंदिरे ‘स्वच्छ’ होणार

तर 2014 मध्ये देयानायके सोमवंश अमरसिंघे यांच्यानंतर जेव्हीपीचे अध्यक्ष झाले आणि 2019 राष्ट्रपती निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या पक्षाला फक्त 3 टक्के मते मिळाली. 2022 मध्ये जेव्हा श्रीलंकेवर आर्थिक संकट आला तेव्हा देयानायके यांनी जोरदार प्रचार करत स्वतःला भ्रष्टाचार विरोधी नेता म्हणून सादर केले आणि दोन वर्षानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती झाले.

follow us

संबंधित बातम्या