कोरोनाची लाट संपली! जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली, WHO ची घोषणा

WHO On Corona Wave : गेल्या तीन-चार वर्षापासून जगात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची (coronavirus) लाट संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. तसेच 30 जानेवारी 2020 रोजी WHO ने लागू केलेली जागतिक आरोग्य आणीबाणी (Corona update) देखील हटवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी कोविड-19 […]

Untitled Design (8)

Untitled Design (8)

WHO On Corona Wave : गेल्या तीन-चार वर्षापासून जगात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची (coronavirus) लाट संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. तसेच 30 जानेवारी 2020 रोजी WHO ने लागू केलेली जागतिक आरोग्य आणीबाणी (Corona update) देखील हटवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी कोविड-19 आणि जागतिक आरोग्य समस्यांबाबत पत्रकार परिषदेला संबोधित करताना ही घोषणा केली. ब्रीफिंग दरम्यान टेड्रोस यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात दर तीन मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जगभरात हजारो लोक अजूनही आयसीयूमध्ये संघर्ष करत आहेत.

शरद पवारांच्या एका दगडात किती पक्षी घायाळ?; युवा ब्रिगेड जोमात

WHO ने सांगितले की 30 जानेवारी 202 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरी कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठई धोका आहे.

कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली तेव्हा चीनमध्ये 100 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी एकही मृत्यू झाला नव्हा. मात्र तीन वर्षांनंतर हा आकडा 70 लाखांपर्यत पोहोचला. सुमारे 20 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

IPL 2023 : कर्णधारांना लागले ग्रहण, KL राहुलसह या तीन संघांचे कर्णधार बाहेर

चीनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाव्हायरसचे पहिले रुग्ण आढळून आले. हळूहळू, हा विषाणू जगभरातील इतर देशांमध्ये वेगाने पसरू लागला. हे लक्षात घेऊन WHO ने 30 जानेवारी 2020 रोजी आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. त्याच वेळी, 11 मार्च 2020 रोजी, कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्यात आले.

Exit mobile version