PM Modi Cyprus Honor : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात युरोपियन देश सायप्रसला पोहचले आहे. या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींना (PM Modi) सायप्रस सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान दिला आहे. आज सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिड्स (President Nikos Christodoulides) यांनी पंतप्रधान मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस 3 ने (Grand Cross of the Order of Makarios 3) सन्मानित केले आहे. याच बरोबर त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला जाहीर पाठिंबा दिला आहे.
तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस 3 सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष निकोस यांचे आभार मानत मी सायप्रस सरकार आणि सायप्रसच्या लोकांचे मनापासून आभार मानतो. हा केवळ नरेंद्र मोदींसाठीच नाही तर 140 कोटी भारतीयांसाठीही सन्मान आहे. हा आपल्या भारतीयांच्या क्षमता आणि आकांक्षांचा सन्मान आहे. हा आपल्या संस्कृती, बंधुत्वाचा आणि वसुधैव कुटुंबकमच्या विचारसरणीचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.PM Modi Cyprus Honor
Humbled to receive the ‘Grand Cross of the Order of Makarios III’ of Cyprus. I dedicate it to the friendship between our nations. https://t.co/x4MX3UZbtW
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2025
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी हा सन्मान भारत आणि सायप्रसमधील मैत्रीपूर्ण संबंध आणि सामायिक मूल्यांना समर्पित करतो. हा पुरस्कार शांती, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता आणि आपल्या लोकांच्या समृद्धीप्रती असलेल्या आपल्या अटळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच येत्या काळात भारत आणि सायप्रसमधील सक्रिय भागीदारी नवीन उंची गाठेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी वर्तवला.
आंदोलनाच्या आधीच ‘जेल’चा डेराव! दबाव तंत्राचा वापर, बच्चू कडूंचे खळबळजनक आरोप
ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस 3 पुरस्कार सायप्रसचे पहिले राष्ट्रपती आर्चबिशप मकारियोस तिसरे यांच्या नावाने दिला जातो. पंतप्रधान मोदींपूर्वी हा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जॉर्डनचे राजा अब्दुल्ला द्वितीय, जर्मनचे माजी अध्यक्ष फ्रँक-वॉल्टर स्टाइनमेयर, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना देण्यात आला आहे.