Download App

Blackout : तांत्रिक बिघाडामुळे पोर्तुगाल स्पेनमध्ये अंधार; वीज पुरवठा खंडित, सर्व सेवा विस्कळित

यामागे सायबर हल्ला असण्याचीही शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्समधील काही भाग

  • Written By: Last Updated:

Europe Blackout : युरोपमधील फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, आणि इटली या देशांमध्ये अनेक ठिकाणी आज अचानक वीजपुरवठा खंडित होऊन अनेक सेवा ठप्प पडल्या. युरोपीय वीज ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड (Blackout) झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा अंदाज काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

यामागे सायबर हल्ला असण्याचीही शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्समधील काही भाग आणि इटली या ठिकाणी सकाळी ११ ते १२ च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. पोर्तुगालमध्ये वीजेविना अनेक रुग्णालयांचे कामकाज ठप्प पडले. संगणकाचाच वापर करता येत नसल्याने रुग्णाचे अहवाल, डिजिटल लॉक असलेल्या फ्रिजमधील लस आणि औषधे मिळविण्यात डॉक्टरांना अडचणी येत आहेत. देशभरातील सिग्नल यंत्रणाही बंद पडली असून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत वाहने कमी वेगाने चालवावीत, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले.

कॉमनवेल्थ घोटाळ्याचा तपास बंद, कलमाडींविरुद्ध पुरावेच नाहीत, ईडीच्या क्लोजर रिपोर्टला मंजुरी

हा ग्रीडमधील तांत्रिक बिघाड असून तो दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे येथील वीज कंपनीने सांगितले. स्पेनमध्येही अशाच प्रकारची समस्या निर्माण झाली. वीज नसल्याने विमानतळे आणि रेल्वेस्थानकांच्या कामकाजातही अडचणी निर्माण झाल्या. काही भागांतील रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या. माद्रिद येथे मोठी टेनिस स्पर्धा सुरू असून वीज नसल्याने आजचे काही सामने रद्द करावे लागले. इटली आणि फ्रान्समध्येही नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले.

अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर फ्रान्स व इटलीमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला होता. वीजपुरवठा खंडित होण्याचा सर्वाधिक फटका पोर्तुगाल आणि स्पेनला बसला. या देशातील रेल्वेसेवा आणि विमानसेवा ठप्प पडली होती. नागरिकांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले. अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत सर्व ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता.

follow us