Download App

Dengue Outbreak : बांग्लादेशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

Dengue Outbreak : भारताशेजारील बांग्लादेशात सध्या डेंग्यू आजाराने थैमान (Dengue Outbreak) घातले असून तब्बल एक हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने देशभरात (Dengue Fever Bangladesh) खळबळ उडाली आहे. मागील वर्षीच्याा तुलनेत चारपट जास्त मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने हॉस्पिटल्सही भरून गेली आहेत. येथे रुग्णांना उपचारासाठी जागा देखील राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आतातर देशातील बहुतांश शहरे आणि ग्रामीण भागात डेंग्यूने हातपाय पसरले असून ताप येऊन लोकांचे मृत्यू होत आहेत.  एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

बांग्लादेशातील अधिकृत आकडेवारीनुसार 2023 मधील पहिल्या नऊ महिन्यात देशात 1017 लोकांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. तर डेंग्यू प्रभावित लोकांची संख्या दोन लांखांच्याही पुढे गेली आहे. ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. बांग्लादेशात डेंग्युच्या संक्रमणाची सुरुवात सन 2000 पासूनच झाली होती. या आजाराने जे मृत्यू झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक नवजात बालकांचाही या आजाराने मृत्यू झाला आहे.

देशात डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे रुग्णालये भरली आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा देखील शिल्लक राहिलेली नाही. दक्षिण आशियातील या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात डेंग्यू आता आधिक प्राणघातक होताना दिसत आहे. देशातील काही ठराविक ठिकाणी आजार पसरला असून लोकांमध्ये तीव्र तापाची लक्षणे दिसून येत आहेत.

VIDEO : मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदच्या साथीदाराची गोळ्या घालून हत्या…

डासांपासून होणाऱ्या अन्य आजारांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. चिकनगुणिया, यलो फिवर, जीका हे आजार डेंग्यूपेक्षाही आधिक वेगाने फैलावू शकतात असे संघटनेने म्हटले आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे या समस्या निर्माण होत असल्याचे संघटनेने मानणे आहे. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही.

Tags

follow us