Elon Musk Forms The America Party : टेस्ला आणि एक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी (Elon Musk) अमेरिकेत एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. नवीन पक्षाच्या माध्यमातून ‘एक पक्षीय व्यवस्थेला’ आव्हान देणार असल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलंय. एलन मस्क यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा (Donald Trump) दिला. सर्वाधिक निधीही दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना त्यांच्या सरकारमध्ये समाविष्ट केले, परंतु बिग ब्युटीफुल बिलामुळे दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला. बिग ब्युटीफुल विधेयकामुळे एलन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प (The America Party) यांच्या सरकारपासून स्वतः दूर झाले.
नवीन राजकीय पक्ष
मस्क यांनी असा दावा केला होता की, यामुळे अमेरिकेचे कर्ज वाढेल. एलोन मस्क यांनी घोषणा केली होती की, जर हे विधेयक मंजूर झाले तर ते एक राजकीय पक्ष स्थापन करतील. दुसरीकडे, अमेरिकेत वन बिग ब्युटीफुल विधेयक मंजूर झाले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही त्यावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. यानंतर, त्यांच्या घोषणेनुसार, एलन मस्क यांनी आता त्यांचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे, ज्याचे नाव अमेरिका पार्टी आहे.
टेक्सासमध्ये हाहा:कार! मुसळधार पावसाने पुरस्थिती, आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू तर 27 जण बेपत्ता
अमेरिकन राजकारणावर वर्चस्व
एलन मस्कच्या पक्षाचं नाव द अमेरिका पार्टी आहे. एलन मस्क यांनी X वर पोस्ट केलंय की, जेव्हा देश दिवाळखोरीत निघतो तेव्हा आपण लोकशाहीत नाही तर एकपक्षीय व्यवस्थेत राहतो. आज, अमेरिका पार्टी तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य परत देण्यासाठी तयार केली गेली आहे. एलन मस्क यांनी यापूर्वी एक सोशल मिडिया सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये त्यांनी लोकांना विचारलं होतं की, दोन शतकांपासून अमेरिकन राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या व्यवस्थेपासून स्वातंत्र्य हवंय का? या सर्वेक्षणाला १.२ दशलक्षाहून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या.
शिवसेना आणि मनसेचा महत्त्वाचा मेळावा सोडून, मिलिंद नार्वेकर कुठे गेले?
यानंतर एलन मस्कने आणखी एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी लिहिले की, 2 ते 1 च्या प्रमाणात तुम्हाला एक नवीन राजकीय पक्ष हवा आहे. त्यांनी शनिवारी पोस्ट केली. यानंतर एलन मस्कने दुहेरी डोके असलेल्या सापाचे मीम शेअर केले. त्याचे कॅप्शन ‘युनिपार्टी संपवा’ असं होतं.