Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरू झालं आहे. मात्र शपथ घेतल्यानंतर लगेचच ट्रम्प यांच्यासमोर नवं संकटही उभं राहिलं आहे. अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) योजनेच्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. DOGE चे नेतृत्व एलन मस्क करत आहेत. सरकारी खर्चात कपात करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित DOGE योजनेचा उद्देश सरकारी खर्चात 2 ट्रिलियन डॉलर्सची कमी आणणे हा आहे. या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांत भीतीचं वातावरण आहे. नोकरी गमावण्याची भीती त्यांना वाटू लागली आहे. AFGE नुसार DOGE योजना संघीय नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे DOGE जोपर्यंत नियमांचे पालन करत नाही तोपर्यंत त्यांना काम करण्यापासून रोखावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीची जबबादारी अब्जाधीश एलन मस्ककडे (Elon Musk) आहे. मस्कच्या योजना कर्मचाऱ्यांचा रोजगार आणि त्यांच्या हितांवर प्रतिकूल परिणाम करू शकते अशी शक्यता आहे. AFGE ने यावर आक्षेप घेत स्पष्ट केलं आहे की या योजनेनुसार जी काही कपात होणार आहे त्यात कर्मचाऱ्यांचा रोजगाराला धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांना निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, ट्रम्प यांनी हार मारली नाही. त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या हिमतीने सत्ता काबीज केली. आणि सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री १०.३० वाजता ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी समारंभ युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदाची शपथ घेतली.
Video: तिसरं महायुद्ध होऊ देणार नाही; शपथविधीपूर्वीचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घोषणांचा पाऊस
पती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मेलानिया ट्रम्प यांनी न्यूयॉर्कहून डिझाइन करण्यात आलेला खास ट्रेस परिधान केला होता. मेलानिया यांचा हा खास ड्रेस राल्फ लॉरेनने डिझाइन केला होता. तसंच या खास ड्रेसवर मेलानिया यांनी बोलेरो जॅकेट घातलं होतं.