Pak PM Shehbaz Sharif Controversy Draft Edited X Post : जगात सध्या दोनच गोष्टींची चर्चा जोरात सुरू आहे. एक म्हणजे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम… आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा ‘मॅजिक ड्राफ्ट’! युद्ध थांबलं की नाही हे नंतर बघू, पण पाकिस्तानची अब्रू मात्र या एका पोस्टने वेशीवर टांगली गेली आहे. ट्रम्प यांची ही अनपेक्षित माघार आणि शरीफ यांच्या ट्विटचा नेमका घोळ काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
‘कोणीही राजा नाही’… ट्रम्प यांच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर; कारण काय?
झालं असं की, 7 आणि 8 एप्रिलच्या मध्यरात्री अख्खं जग ट्रम्प यांच्या इशाऱ्याने थरथर कापत होतं. ट्रम्प यांनी इराणला विनाशाची धमकी दिली होती. पण इकडे आमचे ‘वजीर-ए-आजम’ शाहबाज शरीफ साहेब कोणत्यातरी वेगळ्याच तयारीत होते. रात्री 12:46 वाजता त्यांनी एक लांबलचक पोस्ट केली. पण घाईघाईत साहेब हे विसरले की, त्यांना जो मेसेज ‘बाहेरून’ आला होता, त्यावरील ‘Draft – Pakistan’s PM Message on X’ ही ओळ हटवायचीच राहून गेली.
आता तुम्हीच सांगा, स्वतःच्या देशाची पीआर टीम स्वतःच्याच पंतप्रधानांसाठी ‘पाकिस्तानचे पीएम’ असं ड्राफ्टमध्ये लिहिते का? त्यामुळे आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीये की, हा ड्राफ्ट थेट व्हाईट हाऊसवरून ट्रम्प तात्यांनीच पाठवला होता का? की ‘स्क्रिप्ट’ वाचून पाकिस्तान फक्त अभिनय करतंय? शाहबाज यांच्या एका चुकीमुळे पाकिस्तानचे स्वतःचे स्वतंत्र धोरण नसून, ते कोणा बाहेरील शक्तीच्या ‘स्क्रिप्ट’वर चालत आहेत की काय, अशी शंका जगभरात व्यक्त केली जात आहे.
US-Israel-Iran : दोन आठवड्यांचा ‘युद्ध’विराम, पण दोन्ही देशांत नेमकं काय ठरलंय?
60 शब्दांत शब्द काढला खरा पण…
शाहबाज शरीफ यांचे ‘X’ वरील हे ट्विट तातडीने एडिट करण्यात आले, पण तोपर्यंत इंटरनेटच्या जमान्यात पाकिस्तानचा हा ‘फजिती पॅटर्न’ जगभर व्हायरल झाला होता. शाहबाज यांच्या सोशल मीडिया टीमने अवघ्या 60 सेकंदात आपली चूक सुधारून ‘ड्राफ्ट’ शब्द हटवला खरा, पण या एका मिनिटाच्या चुकीने पाकिस्तानच्या मुत्सद्देगिरीचे वाभाडे निघाले हे मात्र नक्की. आता मध्यरात्रीच्या त्या गडबडीत पोस्ट झालेला तो मजकूर थेट व्हाईट हाऊस किंवा ट्रम्प यांच्या टीमकडून आलेली ‘रेडीमेड स्क्रिप्ट’ होती का? असा जळजळीत सवाल आता जगभरातून विचारला जात आहे. Pak PM Shehbaz Sharif Controversy Draft Edited X Post
Iran US War : ‘शस्त्रसंधी’ची घोषणा फायदेशीर ठरली…कच्चा तेलाच्या किमती घटल्या अन् शेअर बाजारात तेजी…
मुत्सद्देगिरीला संधी देण्याचे आवाहन करणाऱ्या शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प आणि इराणसमोर दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला. मात्र, हा प्रस्ताव मांडताना झालेली ‘कॉपी-पेस्ट’ची चूक त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरली. स्वतःच्याच देशाच्या पंतप्रधानांसाठी ‘Draft’ असा मजकूर असणे, हे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचे दिवाळखोरपण सिद्ध करते. शरीफ यांनी मांडलेली शांततेची भूमिका ही त्यांची स्वतःची नसून, ती बाहेरून मिळालेली ‘स्क्रिप्ट’ असल्याचे या चुकीमुळे जगजाहीर झाले आहे. यामुळे जागतिक राजकारणात पाकिस्तानची भूमिका केवळ एका ‘मॅसेंजर’पुरती मर्यादित असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. एकीकडे कर्जासाठी जगभर कटोरा घेऊन फिरणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच्या ट्विटसाठी पण दुसऱ्याची मदत लागतेय की काय? असाप्रश्नदेखील नेटकरी विचारत असून, युद्ध थांबलं याचं समाधान आहेच, पण शरीफ साहेबांच्या या ‘कॉपी-पेस्ट’ प्रतापाने पाकिस्तानचा ‘एक्स्पोज’ मात्र दणक्यात झालाय. असो, पुढच्या वेळी कॉपी करताना नीट करा असे कानही काही नेटकऱ्यांनी टोचले आहेत.
