डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…

Donald Trump On Iran :  गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढल्याने कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करु शकतो

Donald Trump On Iran

Donald Trump On Iran

Donald Trump On Iran :  गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढल्याने कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करु शकतो अशी माहिती समोर येत आहे. तर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर दहा दिवसात इराणने अणुकरार केला नाहीतर आम्ही इराणवर हल्ला करणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराण दहा दिवसांत अणुकरार करेल किंवा इराणला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. विचारमंथन करण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी दहा दिवस पुरेसा वेळ असेल. दहा दिवसांनंतर जे घडते ते खूप वाईट आणि दुर्दैवी असेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिका-इराण चर्चा

तर दुसरीकडे युद्ध रोखण्यासाठी आणि करार करण्यासाठी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हामध्ये (Geneva) अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि केजेरेड  कुशनर यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची चर्चा करत आहे. वॉशिंग्टनमध्ये गाझा पीस बोर्डाच्या पहिल्या बैठकीत ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की इराणने अणुकरारावर सहमती दर्शविली पाहिजे, अन्यथा संपूर्ण मध्य पूर्वेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितले की, अमेरिकेला इराणसोबत एक मजबूत अणुकरार हवा आहे आणि इराणने शांततापूर्ण करारावर सहमती देणे मध्य पूर्वेच्या हिताचे आहे. संपूर्ण मध्य पूर्वेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करण्याचा इराणला कोणताही अधिकार नाही. जर इराणने पुढील 10 दिवसांत करार केला नाही, तर अमेरिकेला एक पाऊल पुढे टाकावे लागेल. अरबी समुद्रात तैनात असलेल्या सैन्याला हल्ला करण्याचे आदेश द्यावे लागतील आणि त्याचे परिणाम भयानक होतील.

अणुकार्यक्रम बंद होणार नाही : इराण

अमेरिकेने इराणला (Iran) त्याचा अणुकार्यक्रम बंद करण्यास सांगितले आहे. अमेरिकेने इराणला त्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या पल्ल्याची मर्यादा कमी करण्याची अट घातली आहे मात्र इराण दोन्ही अटी स्वीकारण्यास तयार नसल्याने अमेरिका काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इराणने  सांगितले आहे की, तो आपला अणुकार्यक्रम बंद करणार नाही कारण तो अणुशस्त्रे विकसित करण्यासाठी नाही, तर देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि विकासासाठी आहे.

3 मार्च रोजी भारतात दिसणार चंद्रग्रहण; 12 राशींवर काय होणार परिणाम? जाणून घ्या सर्वकाही

इराणवर अमेरिकेचा दबाव ?

हा देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. अरबी समुद्रात अमेरिकेचा लष्करी ताफा तर इराणवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने अरबी समुद्रात आपला लष्करी ताफा तैनात केला आहे, जो  आदेश मिळाल्यावर इराणमधील टार्गेटवर हल्ला करेल. माहितीनुसार या ठिकाणी 50 लढाऊ विमाने, विनाशक, क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण प्रणालींसह दोन मोठ्या युद्धनौका तैनात आहेत.

Exit mobile version