नव्या व्हेरियंटबद्दल डॉक्टर रवी गोडसेंचा दिलासादायक सल्ला, म्हणाले…

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत डॉ. रवी गोडसे यांनी मात्र कोरोनाला काहीही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. चीनमध्ये आलेला व्हायरस नवीन व्हेरियंट नाही, असंही ते म्हणाले. डॉ. रवी गोडसे म्हणाले की, अजिबात घाबरु नका. निधड्या छातीने त्याला समोर जा. एखाद्या गुराला 3 वर्षांपासून […]

Ravi Godase New

Ravi Godase New

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. याबाबत डॉ. रवी गोडसे यांनी मात्र कोरोनाला काहीही घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. चीनमध्ये आलेला व्हायरस नवीन व्हेरियंट नाही, असंही ते म्हणाले.

डॉ. रवी गोडसे म्हणाले की, अजिबात घाबरु नका. निधड्या छातीने त्याला समोर जा. एखाद्या गुराला 3 वर्षांपासून बांधून ठेवलं तर तो जोर दाखवणारंच ना. केसेस येणारच होत्या. यापूर्वी आपण त्याचा सामना केला आहे, भारतीयांना तेवढी काही घाबरण्याची गरज नाही, आपण लसी घेतल्या आहेत, एक काय, दोन काय आणि तीन डोस घेऊन झाले आहेत, मग घाबरण्याची गरज नाहीय.

चीनच्या भयानक चित्राबद्दल रवी गोडसे म्हणाले की, चीनमध्ये लसीकरण चांगलं झालंय. मात्र लसीकरण तुम्हाला गंभीर संसर्गापासून वाचवले किरकोळपासून नाही. काहीही होणार नाही, काहीही करु नका, सर्व काही करुन झालं आहे, म्हणून चीनमधून येणाऱ्या या कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. चीनमध्ये तर भयानक चित्र आहे, लोकांना बेड मिळत नाहीत. अहो, ते सोडून द्या तो चीन आहे, त्यांची लोकसंख्या किती, तुम्ही कशाला काळजी करतायत, झालंय. आपलं कोरोनाशी दोन हात करुन, असंही गोडसे म्हणाले.

चीनमधील व्हायरस बदलला आणि खतरनाक होऊन भारतात आला तरी घाबरण्याचे कारण नाही. आता कोरोना येत राहणार तो अधून-मधून, पुन्हा-पुन्हा नको त्याचे एवढे लाड करायला, तो एवढा काही भयानक रुप दाखवणार नाही. अजिबात कोरोना येतोय म्हणून ताण घेऊ नका, असं देखील रवी गोडसेंनी म्हटलं.

Exit mobile version