Download App

Earthquake : इंडोनेशियात जमीन हादरली! भूकंपाच्या धक्क्याने लोक घराबाहेर पळाले

Earthquake : मागील काही दिवसांपासून भूकंपाचे (Earthquake) प्रमाण वाढले आहे. दक्षिण आशियातील अनेक देशात मागील काही दिवसांत शक्तीशाली भूकंप झाले आहेत. आता इंडोनेशियातील (Indonesia Earthquake) बाली सागर भागात आज पहाटे जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. हा भूकंप इतका जोरदार होता की घरातील वस्तूंची पडझड झाली. या भीतीने लोक घरे सोडून सैरावैरा पळत सुटले.

चंद्रयान 3 च्या पाचपट पुढे जाणार आदित्य L1; तब्बल 14 कोटी 96 लाख किमी लांबून करणार सूर्याचा अभ्यास

या भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू इंडोनेशियातील मातारमच्या उत्तरेला 201 किलोमीटर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 518 किलोमीटर खोल होता. याआधी भारत, बांग्लादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कस्तान या देशात आलेले भूकंपही तीव्र होते. इंडोनेशियातील हा भूकंपही शक्तीशाली होता. मात्र याचा केंद्रबिंदू जमिनीत खोलवर असल्याने काही जास्त नुकसान झाले नाही. मात्र घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याआधी मागील वर्षात नोव्हेंबर महिन्यात इंडोनेशियात भूकंप झाला होता. या भूकंपात मात्र 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर हजारो लोक जखमी झाले होते.

छत्तीसगडात सौम्य भूकंप

काल भारतातील छत्तीसगड राज्यात काही ठिकाणी भूकंप (Earthquake) झाला. हा भूकंप सौम्य होता. या घटनेत अद्याप काही नुकसान झालेले नाही. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय अशलेल्या अंबिकापूर शहराजवळ सायंकाळी उशीरा दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का 8.40 वाजता तर दुसरा धक्का थोड्यावेळाने रात्री 8.56 वाजता जाणवला. याची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. त्याचा केंद्रबिंदू अंबिकापूर शहरापासून दहा किलोमीटर पूर्वेस सुमारे 11 किलोमीटर खोलीवर होता.

Earthquake: नोएडामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Tags

follow us