Download App

फिलीपिन्समध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, ‘या’ देशांना सुनामीचा इशारा

Earthquake : फिलिपाइन्समधील (Philippines) मिडानाओ येथे आज (2 डिसेंबर) 7.4 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हा भूकंप रात्री 8:07 वाजता झाला. त्याचे केंद्र जमिनीत 50 किलोमीटर खोलीवर होते.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने या भूकंपाची तीव्रता 7.5 आणि त्याचा केंद्रबिंदू 63 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले. अहवालानुसार, भूकंपानंतर अमेरिकन त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने सुनामीचा इशारा दिला होता.

त्सुनामी फिलिपाइन्स आणि जपानमध्ये कधी पोहोचेल?
फिलिपाइन्स आणि जपानमध्ये सुनामी येण्याची शक्यता आहे. फिलीपीन भूकंपविज्ञान एजन्सी PHIVOLCS ने सांगितले की त्सुनामीच्या लाटा फिलीपिन्समध्ये मध्यरात्री स्थानिक वेळेनुसार (1600 GMT) पोहोचू शकतात आणि काही तास चालू राहू शकतात.

Assembly election Results 2023: लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार? प्रत्येक अपडेट पाहा लेट्सअपवर !

जपानी प्रसारक NHK ने सांगितले की त्सुनामी लाटा एक मीटर (3 फूट) उंच जपानच्या पश्चिम किनारपट्टीवर थोड्या वेळाने (1:30 वाजता) पोहोचू शकतात.

गेल्या महिन्यात आठ जणांना जीव गमवावा लागला
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण फिलीपिन्समध्ये 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, त्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. 17 नोव्हेंबरच्या भूकंपात सारंगानी, दक्षिण कोटाबाटो आणि दावो ऑक्सीडेंटल प्रांतांमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आणि 13 जण जखमी झाले. त्याचबरोबर 50 हून अधिक घरे आणि इमारतींचे नुकसान झाले.

बनावट नोटांचे रॅकट उद्धवस्त, NIA कडून महाराष्ट्रासह चार राज्यांत छामेमारी

साधारणत: रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रता सामान्यपेक्षा जास्त धोकादायक मानली जाते. फिलीपिन्समधील या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबाबत अपडेट येणे बाकी आहे.

फिलिपाइन्स ‘रिंग ऑफ फायर’मध्ये
फिलीपिन्स पॅसिफिक प्रदेशाच्या ‘रिंग ऑफ फायर’ मध्ये येतो, जिथे भूकंप वारंवार होतात. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने या प्रदेशाचे वर्णन जगातील सर्वात भूकंप आणि ज्वालामुखी सक्रिय क्षेत्र म्हणून केले आहे.

Tags

follow us