रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना अटक झाल्यास जगात भयंकर विध्वंस होणार असल्याचा अल्टिमेटमच रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी दिला आहे. तसेच पुतिन यांना अटक करण्याचा प्रयत्न झाल्यास जगात रशिया युद्धाच्या तयारीत असणार असल्याची ताकीदच मेदवेदेव यांनी दिली आहे.
नितीन गडकरी आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी?
माजी राष्ट्रपती मेदवेदेव म्हणाले, पुतिन यांना अटक केल्यास रशियन शस्त्रास्त्रे युक्रेनसह आंतरराष्ट्रीय न्यायालयावरही हल्ला करतील. किंवा उत्तर समुद्रातून एक हायपरसोनिक रशियन क्षेपणास्त्र हेग स्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर पडू शकतं, त्यामुळे आंतराराष्ट्रीय न्यायालायातील न्यायाधीशांनी आकाशावर लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एक अण्वस्त्रसंपन्न शक्ती असलेल्या देशाच्या राष्ट्रपतींवर खटला चालवण्याचा निर्णय घेतलाय, माज्ञ, या न्यायालायातील न्यायाधीशांनी एका अण्वस्त्रसंपन्न देशाविरोधात असं पाऊल उचलू नये असंह ते म्हणाले आहेत.
Covid-19 : चाचणी-ट्रॅक-ट्रीटमेंट-लसीकरण अवलंबण्याचे राज्यांना आदेश!
दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याविरोधात युक्रेनियन मुलांना डिपोर्ट केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालायातून अटक वॉरंट निघाले आहे. पुतिन यांच्याविरोधात वॉरंट निघाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण चांगलंच तापलं आहे.
युक्रेनमधल्या मुलांना डिपोर्ट केल्याचा आरोप व्लादिमीर पुतिन यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांच्याविरोधात आता कारवाई म्हणून अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांच्याकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी रशियन सरकारनेही आपलं स्पष्टीकरण दिलं असून ते आयसीसीच्या कार्यकक्षेत येत नाही, असं ठणकावून सांगितलंय तरीही पुतीन यांच्याविरोधात अटकेचं वॉरंट काढण्यात आलंय.