Download App

दुबईतील इमारतीला भीषण आग, 4 भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू

Dubai Fire in Building: दुबईमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समजते आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये केरळमधील एका जोडप्यासह चार भारतीयांचा समावेश आहे. दुबईतील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या अल-रास येथे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आणि नंतर ती इतर भागात पसरली अशी प्राथमिक माहिती आहे.

मृत्यू झालेल्या भारतीयांची नावे पुढीलप्रमाणे
भारतीय वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ अधिकारी बिजेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. मृतांमध्ये रिजेश कलंगदान (38), त्यांची पत्नी जेशी कंदमंगलथ (32), गुडू सलियाकुंडू (49) आणि इमामकासिम अब्दुल खादर (43) यांचा समावेश आहे. तर एक एक करून 16 मृतदेह इमारतीतून बाहेर काढण्यात आले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय? जाणून घ्या
दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीला दुपारी सुमारे 12.35 च्या सुमारास आग लागली होती. जी 2:42 वाजता आटोक्यात आली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अपार्टमेंटच्या खिडकीतून काळा धूर आणि ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान तातडीने प्रशासनाने पाऊले उचलत बचावकार्य सुरु केले होते.

एकेकाळचे कट्टर मित्र बनले वैरी; पाटील – महाडिक वाद

केरळच्या दाम्पत्याचा मृत्यू
केरळमधील रिजेश कलंगदान (38) आणि त्यांची पत्नी जेशी कंदमंगलथ (32) हे त्यांच्या शेजाऱ्यांसाठी जेवण बनवत होते. कलंगदान हे ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर होते, तर कंदमांगथ हे शाळेत शिक्षक होते. मात्र या दुर्घटनेत दोघांनी आपले प्राण गमावले आहे.

Tags

follow us