मोठी बातमी, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

Khaleda Zia : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 6 वाजता त्यांनी ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात वयाच्या

Khaleda Zia

Khaleda Zia

Khaleda Zia : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 6 वाजता त्यांनी ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 23 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 11 डिसेंबरपासून ते व्हेंटिलेटरवर होते. अलीकडेच, त्यांचा मुलगा तारिक रहमान 17 वर्षांच्या निर्वासनानंतर बांगलादेशला परतला आणि त्यांनी त्यांच्या आईच्या पक्षाची सूत्रे हाती घेतली.

खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते आणि तुरुंगवास भोगावा लागला होता, परंतु शेख हसीनाचे सरकार कोसळल्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे, जानेवारी 2025 मध्ये उपचारासाठी लंडनला गेल्या होत्या. प्रकृती सुधारल्यानंतर,  मे 2025 मध्ये लंडनहून परतल्या, परंतु नोव्हेंबर 2025 मध्ये प्रकृती अचानक इतकी बिघडली की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी कुटुंबाला परदेशात नेण्याचा सल्ला दिला असला तरी, जोखीम असल्याने उपचारासाठी त्यांना परदेशात नेण्यात आले नाही.

Exit mobile version