Ilhan Omar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींच्या या भाषणावर अमेरिकेच्या दोन महिला खासदारांनी बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकणाऱ्या खासदारांमध्ये रशिदा तलैब (Rashida Talib) यांच्यासह इल्हान उमर यांचाही समावेश आहे. इल्हान उमर (Ilhan Omar) यांची भारत किंवा पीएम मोदींना विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांनी भारताविरोधात अनेक खळबळजनक वक्तव्ये केली आहेत. त्यांचा पाकिस्तानबाबतचा दृष्टिकोन खूपच मवाळ असून त्यांनी पाकिस्तानला भेटही दिली होती. दरम्यान, मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या इल्हान उमर आहेत तरी कोण? त्या सतत भारताविरोधात का बोलत असतात? याच विषयी जाणून घेऊ. (From visiting PoK to spewing venom against India… Who is the American woman MP who opposed PM Modi?)
मोदी सरकारवर आरोप
अमेरिकन खासदार इल्हान उमर यांनी पंतप्रधान मोदी हे सत्तेत आल्यापासून कायम भारताविरोधात वक्तव्य करत आहेत. भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जातात, असा आरोप त्यांनी केला. भारतात अल्पसंख्यांकावर अत्याचार केले जातात, त्यामुळे अमेरिकेने पंतप्रधान मोदींशी संबंध ठेवू नयेत, अशी भूमिका त्यांनी अनेकदा घेतली. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकन संसदेमधील संबोधनावर बहिष्कार टाकताना इल्हान उमर यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, मोदी सरकारने धार्मिक अल्पसंख्याकांवर दडपशाही करून हिंसक हिंदू राष्ट्रवादी संघटनांना प्रोत्साहन दिले. मोदींनी पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना वारंवार लक्ष्य केले आहे. त्यामुळेच मी मोदींच्या भाषणाला उपस्थित राहणार नाही. मोदींना आपल्या राष्ट्राचे व्यासपीठ मिळतेय, हे लज्जास्पद आहे, अशी आशयाचा ट्विट त्यांनी केलं.
I WILL be holding a briefing with human rights groups to discuss Modi’s record of repression and violence.
— Ilhan Omar (@IlhanMN) June 20, 2023
कोण आहेत इल्हान उमर?
इल्हान उमर या 40 वर्षीय अमेरिकन खासदार आहेत. त्यांचा जन्म सोमालियाक झाला. सोमालियात अंतर्गत युध्दामुळे त्यांच्या कुटुंबाने केनियाच्या शरणार्थी कॅम्पमध्ये आश्रय घेतला. त्यावेळी इल्हान अवघ्या 8 वर्षाच्या होत्या. जवळपास चार वर्ष कॅम्पमध्ये राहिल्यानंतर 1990 मध्ये त्यांचे कुटुंब अमेरिकेत स्थाईक झाले. अमेरिकेत त्यांना राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली. 2019 मध्ये त्यांनी अमेरिकेची निवडणूक लढली आणि ती निवडणूक त्यांनी जिंकली. सध्या त्या मिनिसोटाच्या खासदार आहेत. यूएस हाऊसमध्ये खासदार म्हणून काम करणाऱ्या त्या दुसऱ्या मुस्लिम महिला नेत्या आहेत. त्याआधी रशिदा तलैब संसद सदस्य म्हणून अमेरिकन संसदेत गेल्या होत्या.
इल्हान उमर यांच्याशिवाय अमेरिकन खासदार रशिदा तलैब यांनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकला आहे. मुस्मिम आणि अल्पंख्यांकांना टार्गेट करणं चुकीचं आहे.
कोण आहे रशिदा तलैब?
रशिदा तलैब या मिशिगन येथील खासदार आहेत. रशिदा फिलिस्तानी मूळ असलेल्या आईवडिलांच्या 14 मुलांपैकी सर्वात मोठ्या अपत्य आहेत. त्यांचा जन्म डेट्रॉईट शहरात झाला. 2008 मध्ये त्यांनी मिशिगन प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले. मिशिगनमधून खासदार झालेल्या त्या पहिल्या खासदार आहेत.