Japan Governments : अन्नपाणी, औषधे घरात तयार ठेवा; जपान, अमेरिका, ब्रिटेनसह 12 देशांचा नागरिकांना अलर्ट जारी

Japan Governments : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असणाऱ्या संघर्षादरम्यान आता जगात काहीतरी मोठं घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Japan Governments

Japan Governments

Japan Governments : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असणाऱ्या संघर्षादरम्यान आता जगात काहीतरी मोठं घडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिका, ब्रिटन, जपान, नॉर्वे, फिनलँड, स्वीडनसह जगातील 12 देशांनी आपल्या नागरिकांना अलर्ट जारी केला आहे. तसेच घरात आवश्यक सामानांचा साठा ठेवण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. अन्नपाणी, औषधे आणि अन्य आवश्यक वस्तूंचा साठा घरात तयार ठेवा असं आवाहन सरकारांनी केलं आहे.

तर दुसरीकडे अमेरिका (America) , ब्रिटन, जर्मनी, नॉर्वे, फिनलँड, आर्यलँड, स्वीडन, लिथुअनिया या देशांनी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी देखील सुरु केली आहे. माहितीनुसार, या देशांनी कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त दहा दिवसांच्या योजनांवर काम करत आहे. तर अमेरिका 90  दिवसांच्या योजनेवर काम करत आहे. अमेरिकेचे लष्करी तळ कोणाच्याही मदतीशिवाय 90 दिवस स्वतंत्रपणे कार्यरत राहू शकतील या योजनेवर अमेरिका काम करत आहे. खराब हवामान, विजेची कमतरता, इंटरनेट सेवेत बाधा, सायबर हल्ल्याचा धोक्यासह युद्धाची शक्यता अशी विविध कारणं आपत्कालीन परिस्थितीची तयारी करण्यामागे आहेत असं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनने बी रेडी या अभियानाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत लोकांना तीन दिवस पुरेल इतकं पाणी, दीर्घ काळ टिकणारे खाद्य पदार्थ, गरजेची औषधे, बॅटरी, रेडिओ, पॉवर बँक आणि रोकड जवळ ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडून अद्याप तरी कोणताही अलर्ट नागरिकांना देण्यात आलेला नाही पण सैनिकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘मुहूर्त ट्रेडिंग’ दरम्यान गुंतवणूकदार होणार मालामाल ; 7 वर्षांचा डेटा काय सांगतो?-

तर जपानने देखील किमान तीन आणि कमाल सात दिवस पुरेल इतका अन्न आणि पाण्याचा साठा तसेच गरजेची औषधे घरात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तर नॉर्वेने संकट आणि युद्धाच्या तयारीसाठी ३ दिवसांच्या योजनेवर काम सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version