मेक्सिको : जागतिक महासत्ता असलेली अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका कारागृहात अज्ञात बंदूकधारकांनी गोळीबार केलाय. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालंय. यात 10 सुरक्षारंक्षांसह चार कैद्यांचाही समावेश आहे. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिओडाड जुआरेजमधील एका तुरुंगावर अज्ञात बंदुकधारींनी हल्ला केला. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला असून 24 कैद्यांनी पलायन केल्याचं सांगण्यात आलं आहे.
चिहुआहुआ स्टेट प्रॉसिक्यूटरच्या कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हल्ल्यादरम्यान अज्ञात बंदुकधारींनी मिलिटरीच्या गाडीचा वापर केला होता. मृतांमध्ये 10 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. तर चार कैंद्याचाही या गोळीबारात मृत्यू झालाय.
अज्ञात बंदुकधारींनी रविवारी उत्तर मेक्सिकन शहरातील सिओडाड जुआरेझ येथील तुरुंगावर हल्ला केला. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 कैद्यांना पलायन करण्यात यश आल्याचं चिहुआहुआ स्टेट प्रॉसिक्यूटर कार्यालयानं सांगितलं आहे.
निवेदनात म्हटलंय की, हल्ल्याच्या काही वेळापूर्वी बुलेव्हार्डजवळ सशस्त्र लोकांनी महापालिका पोलिसांवरही गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोरांनी तुरुंगाबाहेरील सुरक्षा दलाच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केल्याचं सांगण्यात आलं आहे.