Download App

Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या

  • Written By: Last Updated:

Hardeep Singh Nijjar : NIA च्या वॉन्टेड यादीत समावेश असलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा कॅनडामध्ये खात्मा करण्यात आला आहे. गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते, त्यानंतर त्याला वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. निज्जरची हत्या कोणी केली हे अद्याप समजू शकलेले नाही. कॅनडाच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Ayodhya Poul News : कोण आहेत ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ?

निज्जरचे नाव भारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या वॉन्टेड यादीत समाविष्ट केले होते. जाहीर करण्यात आलेल्या या यादीत निज्जरसह अन्य 40 दहशतवाद्यांचेही नाव होते. निज्जरवर गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या हत्याकांडानंतर त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. खलिस्तान टायगर फोर्सने (KTF) हे संपूर्ण हत्याकांड घडवून आणले होते निज्जर हा या संस्थेचा प्रमुख होता. याशिवाय निज्जरवर भारतातील विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही एनआयएकडून करण्यात आले होते.

बावनकुळे हे गांभीर्याने घेण्यासारखे राजकारणी नाहीत; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

खलिस्तान समर्थकांवर कारवाई
भारतीय एजन्सी एनआयए सातत्याने खलिस्तानी चळवळीवर काम करत असून, अलीकडेच वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल आणि त्याच्या सर्व समर्थकांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर कॅनडा आणि इतर देशांतून काम करणाऱ्या खलिस्तान समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच अमृतपालचा जवळचा सहकारी आणि खलिस्तान समर्थक अवतार सिंग खांडा याचाही रुग्णालयात मृत्यू झाला होता, खांडा यांचाही एनआयएच्या वाँटेड यादीत समावेश होता.

Tags

follow us