Download App

Imran khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानची सुटका, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Imran khan Escape from Jail : माजी परराष्ट्र मंत्री आणि इम्रान खान यांचे निकटवर्तीय शाह मेहमूद कुरेशी यांना पाकिस्तानातील बिघडलेली परिस्थिती आणि राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तत्पूर्वी, बुधवारी विशेष न्यायालयाने इम्रान खानला भ्रष्टाचारविरोधी संस्थेच्या आठ दिवसांच्या कोठडीत पाठवले. देशात निदर्शने सुरूच असून राजधानी इस्लामाबादशिवाय तीन प्रांतांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे.

अटक ‘बेकायदेशीर’ इम्रानची तात्काळ सुटका करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की इम्रानला पोलिस लाइन्स गेस्ट हाऊसमध्ये ठेवले जाईल परंतु त्याला कैदी मानले जाणार नाही आणि इस्लामाबाद पोलिस प्रमुखांना माजी पंतप्रधानांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. “सरकारला इम्रानच्या सुरक्षेची हमी द्यावी लागेल,” असे पाकिस्तानचे सरन्यायाधीश (सीजेपी) उमर अता बंदियाल यांनी निर्देश दिले.

Supreme Court : इम्रान खानची अटक बेकायदेशीर, पाकिस्तानला जेल बनू देणार नाही

सीजेपी, मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अथर मिनाल्ला यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इम्रानच्या अटकेविरोधातील याचिकेवर पुन्हा सुनावणी सुरू केल्याने हे निर्देश देण्यात आले. आदल्या दिवशी, न्यायालयाने नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) ला इम्रानला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर आता इम्रान खान यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली आहे. अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत त्यांची पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. तर त्यानंतर आता त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Tags

follow us