Download App

चिंता वाढली, चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जूनअखेर पुन्हा येणार कोरोनाची लाट

Increase in the number of corona patients in China once again, the wave of corona will come again at the end of June : गेल्या एक वर्षापासून जगभरात कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी झाले होते. कोरोनाबाधितांच्या घटत्या संख्येवरून दिलासा मिळत असतांनाच चीनमध्ये कोरोनाचा कहर (Corona China) पुन्हा एकदा वाढू लागला. चीनमध्ये कोविड निर्बंधांमध्ये काही शिथिलता दिल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय, जूनच्या अखेरीस चीनमध्ये आठवड्यातून 65 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते, असं सांगण्यात येते. त्यामुळे संपूर्ण जगात पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

चीनमध्ये कोरोनाचा XXB प्रकार मोठ्या संख्येने लोकांना संक्रमित करत आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये तेजी दिसून येत आहे. तर चीनी आरोग्य अधिका-यांनी एप्रिलपासून कोविड प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली आहेत.

Pune Crime : अभ्यासासाठी दोघे रात्री एकत्र आले; सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला प्रियकराचा मृतदेह

संसर्गाची वाढलेली प्रकरणे आणि लॉकडाऊन विरोधात वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन चीनने गेल्या वर्षभरात आपले कोविड संदर्भातील शून्य कोविड धोरण अचानक संपुष्टात आणले. त्यामुळं कोरोनाच्या रुग्णांमध्ये अनपेक्षित वाढ झाल्याचं दिसत आहे.

कोविड एपिडेमियोलॉजिस्ट झोंग नानशान यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला अंदाज वर्तवला होता की जूनच्या अखेरीस संपूर्ण चीनमध्ये आठवड्यातून 65 दशलक्ष लोकांना कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. एका अहवालानुसार, चीनमध्ये एका दिवसात नवीन संसर्गाची प्रकरणे 37 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे झोंग यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाची लाट पुन्हा येण्यची शक्यता आहे.

दरम्यान, कोविड व्हायरसच्या या नवीन लाटेबद्दल चिनी अधिकारी आधीच सावध झाले. चीनचे अधिकारी देशातील नागरिकांना कोविड संसर्गाच्या या नवीन प्रकाराविरुद्ध लसीकरण करण्याचे आवाहन करत आहेत. याशिवाय, कोरोनाला आळा घालण्यासाठी बीजिंगमधील आरोग्य अधिकार्‍यांनी लोकांना बस आणि भुयारी मार्गांवर मास्क घालण्याचे नागरिकांना आव्हान केले.

Tags

follow us