Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत (Donald Trump) मोठा खुलासा झाला आहे. निवडणुकीतील प्रचारा दरम्यान (US Elections 2024) ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले होते. अमेरिकेच्या न्याय विभागाने या हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. विभागातील अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे इराणचा हात (Iran) होता. इराणनेच ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती.
मॅनहॅटन येथील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीत हा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयात सांगण्यात आले की इराणच्या अर्धसैनिक क्रांतीकारी गार्डमधील एका अधिकाऱ्याने सप्टेंबर महिन्यात एका शूटरला ट्रम्प यांच्यावर नजर ठेवणे आणि त्यांना मारण्यासाठी प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. फरहाद शकेरी असे या आरोपीचे नाव आहे. लूटमारीच्या गुन्ह्यात १४ वर्षे अमेरिकेतील तुरुंगात शिक्षा भोगलेल्या फरहादची टोळी अमेरिकेत कार्यरत आहे. या टोळीकडून हत्येची सुपारी घेतली जाते. अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेने शकेरीचा दूरध्वनीद्वारे जबाब नोंदवला. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
ज्या व्यक्तीला ट्रम्प यांच्या हत्येची जबाबदारी देण्यात आली होती. तो व्यक्ती इराणच्या सरकारमध्ये कर्मचारी होता. १३ जुलै रोजी पेंसिल्वेनियातील बटलर शहरात एका रॅलीत भाषण देत असताना ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली होती. या घटनेत ट्रम्प किरकोळ जखमी झाले होते. या घटनेच्या ६४ दिवसांनंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी ट्रम्प फ्लोरिडात पाम बीच काउंटी येथील इंटरनॅशनल गोल्फ क्लबमध्ये होते.
मोठी बातमी! आता अमेरिकेत ट्रम्प सरकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी गाठलं बहुमत
अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाल्यानंतरक इराणने अतिशय सावध प्रतिक्रिया दिली होती. ट्रम्प यांच्या विजयाचा इराणवर काहीही परिणाम होणार नाही. दोन्ही देशांतील धोरणे आधीपासूनच निश्चित आहेत. त्यामुळे कोणताही व्यक्ती पदावर आला तरी काही बदलणार नाही अशी प्रतिक्रिया इराणी राष्ट्रपतींच्या प्रवक्त्याने दिली होती.
दरम्यान, ट्रम्प यांची हत्या करण्याच्या होत असलेल्या आरोपांवरही इराणने प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते बगई म्हणाले, अमेरिकेच्या न्याय विभागाने लावलेले आरोप निराधार आहेत. हा रिपोर्ट खोटा आणि निराधार आहे. याआधीही अशा प्रकारचे अनेक आरोप इराणवर लावण्यात आले होते. प्रत्येक वेळी हे आरोप निराधार सिद्ध झाले होते.
दरम्यान, अमेरिकेत ५० राज्ये आहेत. यामध्ये बहुतांश राज्ये प्रत्येक निवडणुकीत एकाच पक्षाला मतदान करत आले आहेत. निवडणुकीत महत्वाचे मानले जाणाऱ्या सात स्विंग स्टेटमधील मतदारांचा कल बदलता असतो. लोकसंख्येच्या आधारावर राज्यांना निर्वाचक मंडळ मते दिली जातात. एकूण ५३८ इलेक्टोरल कॉलेजसाठी मतदान होते. २७० किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल कॉलेज मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुमत गाठलं. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला.
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी आघाडी, कमला हॅरिस पिछाडीवर; वाचा, कुणाला किती मते..