International Poverty Eradication Day 2024 : दरवर्षी 17 ऑक्टोबर या दिवशी जागतिक गरिबी निर्मूलन दिवस साजरा (International Poverty Eradication Day 2024) केला जातो. वास्तवात गरिबीच्या मुद्द्यांवर एक आहे. उपासमार आणि कुपोषणाच्या रुपात दारिद्र्य प्रकट होते. शिक्षण आणि मूलभूत सेवा सुविधांच्या बाबतीत भेदभाव दिसतो. आजमितीस जगात जवळपास साडेचार कोटी गरिबीत जीवन कंठत आहेत.
गरिबीत जीवन जगणारे लोक आणि समाजात संवाद वाढविण्याच्या उद्देशाने जागतिक पातळीवर हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. गरीबी मानवी जीवनाचे मौलिक अधिकार आणि स्वातंत्र्याच्या आनंदातही अडसर आणते. गरिबीचा नायनाट करणे म्हणजे फक्त गरिबांची मदत करणे असे नाही तर पुरुष आणि महिलांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी देणे हा या मागचा खरा उद्देश आहे.
जगातील २६ देशांवर कर्जाचा भार वाढला, १८ वर्षांतील उच्चांक; नव्या अहवालात धक्कादायक माहिती
गरीबी निर्मूलन दिवसाचा इतिहास पाहायचा म्हटलं तर याचा इतिहास 17 ऑक्टोबर 1987 या दिवशी मिळतो. 1987 मध्ये याच दिवशी हजारो लोक पॅरिस शहरातील ट्रोकाडेरो मध्ये एकत्र जमले होते. गरीबी मानवाधिकारांचे उल्लंघन आहे असे या लोकांनी म्हटले होते. यानंतर दरवर्षी गरिबीने ग्रस्त असणाऱ्या लोकांबरोबर आहोत असा संदेश देण्यासाठी 17 ऑक्टोबर रोजी लोक एकत्र जमू लागले. डिसेंबर 1992 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषणा केली की दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी हा दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाईल. गरीबी निर्मूलनसाठी जागतिक दिवस असे याला संबोधले जाऊ लागले.
आज जगात गरिबीची समस्या सातत्याने वाढत चालली आहे. गरीबी म्हणजे काय, त्याचे निकष काय आहेत, गरीबी दूर कशी करता येईल याबाबत लोकांत जागरुकता निर्माण करणे. जे लोक आणि देश गरीबीत आहेत त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी जागतिक गरीबी निर्मुलन दिनाचे महत्व आहे. यासाठी दरवर्षी जगात हा दिवस साजरा करण्यात येतो.
गरिबीच संकट वाढलं! जगातील ‘या’ दहा देशांत प्रचंड गरीबी, उत्पन्नातही घट
आज जगात सर्वाधिक गरीब देश आफ्रिकेत आहेत. यामध्ये दक्षिण सुदान, बुरुंडी, मध्य आफ्रिका गणराज्य, कांगो, मोजाम्बिक, मलावी, नायजर, चाड, लायबेरिया, मेदागास्कर हे दहा देश सर्वाधिक गरीब आहेत. या देशांतील लोकांचे वार्षिक उत्पन्न अतिशय कमी आहे. या व्यतिरिक्त आणखीही बरेचसे गरीब देश आफ्रिका खंडात आहेत.