Riyadh US Embassy : इस्त्रायल आणि अमेरिकेच्या कारवाईनंतर आता इराणकडून देखील दोन्ही राष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. काल मध्यरात्री इराणने इस्त्रायलसह अरब देशांवर ड्रोन हल्ले करत अमेरिकेला इशारा दिला आहे. यामध्ये सौदी अरेबिया, कुवेत, युएई, कतार आणि बहरीन यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे काल मध्यरात्री इराणने सौदी अरेबियातील रियाधमध्ये असणाऱ्या अमेरिकन दूतावासावर दोन ड्रोनने हल्ला केले. या हल्ल्यामुळे दूतावासाला किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती सौदी अरेबियाकडून देण्यात आली आहे.
इराणकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला (Iran) धमकी देत कारवाईचा इशारा दिला. सौदी अरेबियातील आमच्या दूतावासावरील हल्ल्याला काय प्रतिसाद मिळेल हे तुम्हाला लवकरच कळेल असा असा ट्रम्प यांच्याकडून देण्यात आला आहे.
इराणवर कारवाई
तर दुसरीकडे सोमवारी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ले करण्यात आले होते. तर आता इराण अरब देशांवर हल्ले करत अमेरिकेला प्रत्युत्तर देत आहे. काल मध्यरात्री करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणने कतारमधील पॉवर प्लांट आणि सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर हल्ले केले आहे.
तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकन सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे आणि अमेरिका हा संघर्ष सहज जिंकेल. ही मोहीम चार ते पाच आठवडे चालेल असा अंदाज होता, परंतु अमेरिकेकडे जास्त काळ कारवाया चालू ठेवण्याची क्षमता आहे.
भारतात आज चंद्रग्रहण; ‘या’ शहरांमध्ये दिसणार, जाणून घ्या सुतक नियम-
ट्रम्प म्हणाले की आवश्यक असल्यास, आम्ही सैन्य तैनात करू. ट्रम्प म्हणाले की, जवळजवळ 47 वर्षांपासून, ही (इराणी) राजवट अमेरिकेवर हल्ला करत आहे आणि अमेरिकन लोकांना मारत आहे. रस्त्यावरील बॉम्बचे जनक जनरल सुलेमानी यांना मी माझ्या पहिल्या कार्यकाळात संपवले. आपण सध्या जे करत आहोत ते थांबवण्याची आणि या आजारी आणि दुष्ट राजवटीने निर्माण केलेल्या असह्य धोक्यांचा अंत करण्याची ही आमची शेवटची आणि सर्वोत्तम संधी होती.
