Strait of Hormuz : इराण आणि अमेरिके दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा फटका भारतासह जागातील अनेक देशांना बसत आहे. तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. भारतात देखील अनेक शहरात गॅस खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इराणने मोठा निर्णय घेत दोन भारतीय एलपीजी टॅकर्सना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. इराणने घेतलेल्या या निर्णयानंतर देशात विस्कळीत झालेला गॅस पुरवठा पुन्हा एकदा सामान्य होण्यास मदत होणार आहे.
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका (America) आणि इस्त्रायलकडून (Israel) करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इराणने (Iran) प्रत्युत्तर म्हणून हॉर्मझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्याची घोषणा केली होती. इराणच्या या घोषणेनंतर भारतासह जागातील अनेक देशात तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र आता इराणने भारताला मोठा दिलासा देत दोन एलपीजी टॅकर्सना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. भारत हा आमचा जुना मित्र देश आहे आणि आम्ही या समस्येचं समाधान करण्याचा प्रयत्न करत आहोत असं इराणचे भारतीय राजदुत मोहम्मद फतहाली (Mohammad Fatahali) यांनी म्हटले आहे. तसेच ही सामुद्रधुनी बंद करण्याचा किंवा तिची नाकेबंदी करण्याचा इराणचा कधीच उद्देश नव्हता. काही जहाजे अद्यापही या मार्गावरून प्रवास करत आहे असं देखील ते म्हणाले.
Iran has allowed two Indian-flagged liquefied petroleum gas (LPG) carriers to sail through the Strait of Hormuz, four sources with direct knowledge of the matter said: Reuters pic.twitter.com/8wAvHOK05b
— ANI (@ANI) March 13, 2026
तर दुसरीकडे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकून पडलेल्या भारतीय ध्वज असलेल्या 28 जहाजांपैकी एका जहाजाने सुरक्षितपणे आपला प्रवास सुरू केला आहे. नौवहन मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, भारतीय ध्वज असलेला तेल टँकर ‘जग प्रकाश’ (Jag Prakash) जो ओमानमधून आफ्रिकेकडे गॅसोलीनची वाहतूक करत आहे त्याने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या पूर्व बाजूने आपला प्रवास सुरू केला आहे.
‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?-
तसेच एकूण 28 भारतीय जहाजे अडकून पडली होती. त्यांपैकी 28 जहाजे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिम बाजूला, तर चार जहाजे पूर्व बाजूला अडकली होती. पूर्व बाजूला असलेल्या चार जहाजांपैकी एक असलेले ‘जग प्रकाश’ हे जहाज आता इंधनाची वाहतूक करत आफ्रिकेकडे रवाना झाले असल्याची माहिती राजेश कुमार सिन्हा यांनी दिलीय.
