Iran-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संपूर्ण ‘युद्धविराम’; विनाशकारी हल्ले स्थगित, शस्त्रसंधी जाहीर

युद्धाच्या 40 व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाला संपूर्ण युद्धविराम दिला असून दोन आठवड्यांसाठी हल्ले स्थगित केले आहेत.

Donald Trump (10)

Donald Trump (10)

Iran-Israil War : तब्बल 40 दिवसांपासून सुरु असलेला इराण-इस्त्राइल (Iran-Israel War) संघर्षाला आज पूर्णविराम मिळालायं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम देण्यात आला असून इराणवरील विनाशकारी हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीयं. यासंदर्भातील घोषणा करताना ट्रम्प यांनी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर आज थांबलं आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे.


Video : इराण-अमेरिका युद्ध कधी थांबणार?, ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितली तारीख

अमेरिकेच्या प्रस्तावातील प्रमुख मुद्दे..
१. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘संपूर्ण युद्धविराम’ (Complete Ceasefire) जाहीर.
२. इराणचा सकारात्मक प्रतिसाद आणि दोन आठवड्यांसाठी युद्धबंदीची तयारी.
३. चर्चेसाठी ‘होरमुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) खुली करण्याची अट.
४. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किमतीत घसरण आणि ९२ डॉलरचा स्तर.
५. जागतिक बाजारपेठेत मोठी तेजी आणि डाऊ फ्युचर्समध्ये ९०० अंकांची वाढ.
६. भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत सकारात्मक संकेत आणि मोठ्या वाढीची शक्यता.

इराणच्या प्रस्तावातील प्रमुख मुद्दे

* इराण आणि अमेरिका दरम्यान परस्परांविरुद्ध अनाक्रमणाची वचनबद्धता
* होरमुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पूर्ण नियंत्रण
* इराणच्या युरेनियम संवर्धन कार्यक्रमाला अधिकृत मान्यता
* इराणवरील सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंधांची पूर्ण समाप्ती
* संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या सर्व ठरावांचे विसर्जन
* इराणला झालेल्या नुकसानीबद्दल आर्थिक भरपाईची तरतूद
* मध्यपूर्वेतील प्रदेशातून अमेरिकन लढाऊ सैन्याची संपूर्ण माघार
* लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्ध थांबवण्याचा निर्णय
* १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीने चर्चा सुरु
* १५ दिवसांचा चर्चा कालावधी आणि परस्पर संमतीने मुदतवाढीची शक्यता

Exit mobile version