Download App

Iran Port Blast : मोठी बातमी! इराणच्या बंदरात स्फोट, 500 हून अधिक लोक जखमी

Iran Port Blast : इराणमधील एका बंदरात मोठा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार या स्फोटमध्ये 500 हून अधिक लोक जखमी झाले

  • Written By: Last Updated:

Iran Port Blast : इराणमधील एका बंदरात मोठा स्फोट झाला (Iran Port Blast) असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार या स्फोटमध्ये 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी इराणच्या (Iran) बंदर अब्बास शहरातील शाहिद राजाई बंदरात एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 500 पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून काही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती देखील वर्तवण्यात येत आहे.

स्फोटाच्या वेळी बंदरावर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. स्फोटानंतर घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असे देखील सांगण्यात येत आहे. सध्या स्फोटाचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहीद राजाई बंदराजवळ समुद्रकिनाऱ्याजवळ ठेवलेल्या अनेक कंटेनरमध्ये स्फोट झाल्यामुळे हा अपघात झाला. आम्ही सध्या जखमींना बाहेर काढत आहोत आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

तर दुसरीकडे सध्या ओमानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरारावर चर्चा सुरु आहे. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या नेतृत्वाखाली ही चर्चा सुरू आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये 175 संशयित ताब्यात

या चर्चेचा उद्देश नवीन अण्वस्त्र करारावर पोहोचणे आहे, ज्याचा उद्देश इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखणे आहे. त्या बदल्यात, अमेरिका इराणवर लादलेले कठोर निर्बंध उठवू शकते. अशी चर्चा सध्या सुरु आहे.

follow us