Israel Rocket Attack : इस्रायलमधील (Israel) परिस्थिती स्फोटक बनली आहे. पहाटे चार वाजल्यापासून हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. या रॉकेट हल्ल्यात (Rocket Attack ) आतापर्यंत बळी गेलेल्यांचा आकडा 200 च्या पुढे गेला आहे. तर 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय मोठ्या संख्येने लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
सकाळी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून रॉकेट हल्ला केला. इस्त्रायलच्या हद्दीत दोन तासांत 5,000 हून अधिक रॉकेट डागण्यात आले. अनेक दहशतवाद्यांनीही घुसखोरी केली. इस्त्रायल सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळं राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी शनिवारी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. या हल्ल्यात आतापर्यंत किमान २०० हून अधिक बळी गेले.
या हल्ल्यात 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गाझामधून इस्रायलमध्ये घुसखोरी करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात देशाच्या दक्षिण आणि मध्य भागातील शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे.
गाझामधून इस्रायलमध्ये घुसखोरी करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात देशाच्या दक्षिण आणि मध्य भागातील शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. यानंतर आता इस्त्रायल लष्करानेही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं आङे.
दरम्यान, हमासने काही व्हिडिओ फुटेज जारी केले आहेत. या फुटेजमध्ये हमास दहशतवादी हल्ल्यादरम्यान इस्रायली दहशतवाद्यांना पकडताना दिसत आहे.
52 जण आोलीस
उल्लेखनीय आहे की, इस्रायलने एक दिवस अगोदरच ५० वा वर्धापन दिन साजरा केला होता. दुसऱ्याच दिवशी त्याला एवढ्या मोठ्या हल्ल्याला सामोरे जावे लागले. व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडिओ क्लिपमध्ये लोकांना दहशतवादी संघटनेने ओलिस ठेवले असल्याचे दाखवले आहे. ही संख्या 52 असल्याचा दावा अरबी माध्यमांनी केला आहे. पकडलेल्यांपैकी काहींना तर मृत्यूदंडही देण्यात आला. सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान लष्कराने मृत किंवा ओलीस यांची माहिती देण्यास नकार दिला आहे.
नेतान्याहूंवर टीका
हमासच्या हल्ल्याने नेतन्याहू आणि त्यांच्या युतीतील अन्य नेत्यांवर तीव्र टीका होऊ लगाली. नियोजन आणि समन्वयाच्या पातळीवर हमासच्या हल्ल्याचा अंदाज लावण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल राजकीय विश्लेषकांनी टीका केली. हमासने केलेल्या अभूतपूर्व रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशातील जनतेला सांगितले की, आम्ही युद्धात आहोत. हमासने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागल्यानंतर आणि दक्षिण इस्रायलमध्ये अतिरेक्यांची घुसखोरी यानंतर नेतन्याहू यांनी आपल्या दूरचित्रवाणी भाषणात हे सांगितले.
इस्रायलमधील भारतीयांना सूचना
इस्रायलमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. इस्रायलमधील परिस्थिती पाहता सर्व भारतीयांनी सतर्क राहिले पाहिजे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करा. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. अधिक मदतीसाठी दूतावासाशी संपर्क साधा, असे भारतीय दूतावासाने एका निवेदनात म्हटले.