Prime Minister Benjamin Netanyahu’s Phone call to Prime Minister Modi during Israel Iran War : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढतच चालला (Israel Iran War) आहे. शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा (Israel Attack) हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला (Tehran City) टार्गेट करण्यात आलं. तुफान बॉम्बफेक करण्यात आली. या हल्ल्यांत संपूर्ण तेहरान हादरून गेले. या हल्ल्याला इराणने देखील उत्तर दिले. या दरम्यान आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू?
इस्त्रायल आणि इराणच्या (Israel Iran War) दरम्यान वाढत असलेल्या तणावामध्ये आताबेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत पोस्ट करत सांगितलं की,नेतान्याहू यांनी आपल्याला इराणबाबतची परिस्थिती सांगितली. यावेळी मी त्यांना भारताच्या परिस्थितीबाबत सांगितलं आणि प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेवर जोर दिला.यादरम्यान भारताने घेतलेली भूमिका अशी आहे की. दोन्हीही देशाने तणाव वाढेल असे कुठलेही पाऊल उचलू नये.
Received a phone call from PM @netanyahu of Israel. He briefed me on the evolving situation. I shared India's concerns and emphasized the need for early restoration of peace and stability in the region.
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2025
त्याचबरोबर आता नेतान्याहू (Israel Iran War) यांनी उच्चस्तरीय कुटनितीवर चर्चा सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी जगभरातील अनेक राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केले आहेत. ते या परिस्थितीची माहिती देत आहेत. यामध्ये जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज, फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मॅक्रो यांना त्यांनी फोन केला आहे. तसेच ते लवकरच आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत.