Download App

मोठी बातमी! इस्रायलकडून गाझामध्ये हवाई हल्ले; लहान मुलांसह 33 जणांचा मृत्यू

इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे 33 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसच, इमारती जमीनदोस्त झाल्या.

Israel Gaza War : गेल्या दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरुये. गाझा पट्टीतील परिस्थिती तर आणखी बिकट झालीये. पुन्हा एकदा इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांमुळे 33 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Israel) मृत्यू झालेल्यांमध्ये यात काही लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेक मोठ्या इमारतींचं नुकसान झालं आहे.

काल एका दिवसात गाझामधील 100 हून अधिक ठिकाणांवर हल्ला केला आहे. यात मोठं नुकसान झालं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू युद्धबंदीच्या चर्चेसाठी अमेरिकेला जाणार आहेत. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला आहे. डोनाल्ट ट्रम्प हे या युद्धबंदी साठी प्रयत्न करत आहेत. 21 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होणार आहे असं इस्रायली सैन्याने या हल्ल्याबाबत बोलताना म्हटलं आहे.

गाझामध्ये नरसंहार सुरुच, इस्रायल सैन्याकडून पुन्हा हल्ला, 30 पॅलेस्टिनींचा मृत्यू, शेकडो जखमी

गाझा शहरातील शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेल्मिया यांनी सांगितले की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात मोठे नुकसान झालं आहे. गाझा शहरातील दोन घरांवर निशाणा साधण्यात आला. यात 20 लोक ठार झाले आणि 25 जण जखमी झाले आहेत. तसंच, नासिर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मुवासी भागात झालेल्या हल्ल्यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतील 130 ठिकाणी हल्ला केल्याचेंसमोर आलं आहे. या हल्ल्यांमध्ये हमासच्या कमांड अँड कंट्रोल स्ट्रक्चर्स, स्टोरेज सेंटर्स आणि शस्त्रास्त्रांना लक्ष्य करण्यात आलं. त्याचबरोबर उत्तर गाझामधील अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच, शनिवारी इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 47 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us