Download App

Israel Palestine Conflict : इस्त्रायलमधील भारतीय सुखरुप घरी येणार; सरकारने सुरू केलं ‘ऑपरेशन अजय’

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्त्रायली, पॅलेस्टिनी नागरिक आणि सैनिकांचाही समावेश आहे. हमासच्या अतिरेक्यांनी दक्षिण इस्त्रायलवर (Israel Attack) हल्ले करून मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. हमासने समुद्र आणि हवेतून रॉकेट हल्ले केले. तसेच देशात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यात हजारो इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इस्त्रायलनेही युद्ध घोषित केलं. इस्त्रायलनेही जशास तसे उत्तर देत हल्ले सुरू केले. या युद्धग्रस्त देशात भारतीय नागरिकही अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी आता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन अजय (Operation Ajay) सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. इस्त्रायलमध्ये अडकलेल्या ज्या भारतीयांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष चार्टर विमाने आणि अन्य व्यवस्था करण्यात येत आहे. आम्ही परदेशात आमच्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी वचनबद्ध आहोत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

इस्त्रायलमध्ये शिक्षण रोजगारानिमित्त अनेक भारतीय नागरिक स्थलांतरीत झाले आहेत. तसेच काही जण पर्यटनासाठी म्हणूनही येथे गेले आहेत. अमर उजाला या हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इस्त्रायलमध्ये आजमितीस 18 हजार भारतीय आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय नागरिक येथेच अडकून पडले आहेत. भारतीयांप्रमाणेच अन्य देशांचेही नागरिक येथे आहेत. या नागरिकांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या देशांनी विशेष विमाने पाठवली आहेत. आता भारत सरकारनेही तसाच निर्णय घेतला असून या युद्धग्रस्त देशातून भारतीयांना सुखरुप मायदेशी घेऊन येणार आहे.

Israel-Hamas War : ….तर इस्त्रायलाचाच सर्वनाश होईल; तुर्की राष्ट्राध्यक्षांचा इशारा

दरम्यान, दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीत इस्रायली युद्ध विमाने आणि विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रगत तपास यंत्रणा बसवली होती. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गाझा येथून येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या विमानांवर नजर ठेवता येणार होती. मात्र, इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे हमासचे हे ट्रॅकिंग नेटवर्क मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज