Jaishankar on Canada : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) सध्या अमेरिका दौऱ्यावर (America tour) आहेत. गेल्या काही दिवसांत कॅनडासोबत (Canada) भारताचे संबंध बिघडल्यानंतर जयशंकर यांची ही भेट महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की अनेक वर्षांच्या संघर्षातून हे उद्भवले आहे. कॅनडाने दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना पाठिंबा दिला आहे. त्यांना तिथे आश्रय मिळाला आहे. अमेरिकन लोक कॅनडाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. पण आमच्यासाठी कॅनडा हा भारतविरोधी कारवायांचे केंद्र राहिलेला देश आहे.
भारतातील संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी असलेले लोक कॅनडामध्ये जात आहेत. कॅनडामध्ये मानवी तस्करी, फुटीरतावाद, हिंसाचार आणि दहशतवादाचे कॉकटेल शिखरावर आहे. अशा लोकांचे आणि समस्यांचे विषारी मिश्रण येथे तयार झाले आहे. त्याला तिथे जागाही मिळत आहे.
मुंबईच्या स्वच्छतेवरून Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा; भाजप म्हणते जरा लाज वाटू…
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले की, गुरुवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत झालेल्या भेटीत खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी चर्चा झाली. ते म्हणाले की, आमच्यात संवाद झाला. या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेने आपली भूमिका मांडली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी पदकांची लयलूट; नेमबाजीत 5 पदके, टेनिसमध्ये रौप्य
परराष्ट्र मंत्री म्हणाले की, कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी काही आरोप आधी खाजगीत आणि नंतर सार्वजनिकरित्या केले. आमचा प्रतिसाद खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारे असा होता. त्यांचे आरोप भारताच्या धोरणाशी विसंगत आहेत. भारताने याकडे लक्ष द्यावे अशी काही संबंधित आणि विशिष्ट बाब असेल तर सरकार त्यासाठी तयार आहे.पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले एस जयशंकर सध्या वॉशिंग्टनमध्ये आहेत. गुरुवारी त्यांनी ब्लिंगेन आणि सुव्हिलॉन यांची भेट घेतली.