जपानमध्ये शुक्रवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने नोंदवले की त्याचा केंद्रबिंदू टोकियोच्या पूर्व-दक्षिणपूर्व 107 किमी अंतरावर होता. भूकंपाची खोली 65 किमी असल्याचे त्यांनी सांगितले.
त्सुनामीचा इशारा नाही :
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, दुपारी ३.३३ च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. अद्याप कोणत्याही नुकसानीचे वृत्त समोर आलेले नाही. तसेच त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. चिबा आणि इबाराकी प्रीफेक्चरमध्ये जोरदार हादरे जाणवले, परंतु USGS ने सांगितले की अधिक नुकसान होण्याची शक्यता कमी आहे.
5 मे रोजी झालेल्या भूकंपामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता
स्थानिक क्योडो वृत्त सेवेने सांगितले की इबाराकी येथील टोकाई क्रमांक 2 अणुऊर्जा प्रकल्पात कोणतीही समस्या आढळली नाही. यापूर्वी, 5 मे रोजी मध्य जपानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्यात एकाचा मृत्यू झाला होता आणि 20 हून अधिक जण जखमी झाले होते. जपान हा जगातील सर्वात जास्त भूकंपग्रस्त देशांपैकी एक आहे.