Japan Moon Mission : जपानही चंद्राच्या दिशेने! पहाटेच लाँच केले रॉकेट

Japan Moon Mission : भारताने चांद्रयान मोहिम यशस्वी करत चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जपाननेही चंद्राकडे (Japan Moon Mission) झेप घेतली आहे. जपानने चंद्रमोहिम लाँच केली आहे. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 5.12 वाजता H2-A रॉकेटसोबत दोन अंतराळयाने प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेत जपान चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. जपानने या मोहिमेचे नाव SLIM असे ठेवण्यात आले आहे. […]

Japan Moon Mission

Japan launches his moon mission today

Japan Moon Mission : भारताने चांद्रयान मोहिम यशस्वी करत चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जपाननेही चंद्राकडे (Japan Moon Mission) झेप घेतली आहे. जपानने चंद्रमोहिम लाँच केली आहे. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 5.12 वाजता H2-A रॉकेटसोबत दोन अंतराळयाने प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेत जपान चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. जपानने या मोहिमेचे नाव SLIM असे ठेवण्यात आले आहे. जपानने जे रॉकेट लाँच केले आहे त्यात एक एक्स रे टेलिस्कोप आणि एक लँडर आहे. पहाटे रॉकेट लाँच केल्यानंतर दोन टप्प्यांत टेलिस्कोप आणि लँडर रॉकेटपासू वेगळे झाले. ही दोन्ही उपकरणे चंद्रावर पोहोचली तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जपान भारतानंतर पाचवा देश ठरेल.

या मोहिमेसाठी अनेक महिन्यांपासून तयारी केली जात होती. मात्र प्रत्येक वेळी काहीतरी कारणांमुळे प्रक्षेपण लांबणीवर पडत होतं. याआआधी 25 ऑगस्ट रोजी लाँचिंग करण्यात येणार होते. मात्र, हवामान चांगले नसल्याने प्रक्षेपण करता आले नाही. याआधीही प्रयत्न करण्यात आला होता मात्र, लाँचिंग अयशस्वी ठरले होते. या मोहिमेत चंद्रावर एक्स रे इमेजिंग अँड स्पेक्ट्रोस्कोपी मिशन म्हणजेच XRISM नावाचा टेलिस्कोप पाठविला आहे. याबरोबरच स्मार्ट लँडर इन्व्हेस्टिंग मून (SLIM) लँडर पाठवणार आहे. हे लँडर अतिशय कमी जागेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.

चंद्रानंतर भारत सूर्याच्या दिशेने

चांद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या यशानंतर भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने (ISRO) आणखी एक धाडसाची कामगिरी हाती घेत संपूर्ण भारतवासियांचे लक्ष वेधणारे आदित्य L1 चे (Aditya L1) प्रक्षेपण यशस्वी करून दाखवले. सूर्याचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. सूर्याच्या अचूक कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी या यानाला 125 दिवस लागणार आहेत. पीएसएलव्ही सी 57 हा शक्तीशाली वाहक आदित्य एल1 यानाला घेऊन अंतराळात झेप घेतली. या यानाला अचूक कक्षा गाठण्यासाठी 125 दिवस लागतील, असे इस्त्रोचे संचालक सोमनाथ यांनी सांगितले.

Aditya L1 Mission : चंद्रानंतर सूर्याकडे झेप! आदित्य L1 चं आज होणार प्रक्षेपण

Exit mobile version