तुम्ही फक्त तीन तास का झोपता ? जपानच्या पंतप्रधानांना विरोधकांनी थेट राजीनामा मागितला

Sanae Takaichi: 65 वर्षीय जपानच्या 65 वर्षीय पंतप्रधान साने ताकाइची यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने जगभरात चर्चा सुरू झालीय.

Sanae Takaichi

Sanae Takaichi

Japan’s Prime Minister Sanae Takaichi : दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला जपान आपलेला माहितीये. हा देश कष्टाळूपणा, अचूकता आणि तांत्रिक प्रगतीसाठी जगभर ओळखला जातोय. आता येथील पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाइ (Sanae Takaichi) एका वादात अडकल्यात. विरोधी पक्षांनी त्यांना घेरले आहे. बंर हा वाद भ्रष्टाचार किंवा जवळच्या व्यक्तीला कंत्राट दिल्यावरून, पक्षाला निधी दिल्यावरून उफाळून आला असावा, असे तुम्हाला वाटतंय. पण जरा थांबा हा वाद पंतप्रधानांच्या झोपेवरून निर्माण झालाय. येथील पंतप्रधान कामात इतक्या व्यस्त आहेत. त्या केवळ तीन तास झोप घेतात. त्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय.

एक दिवस सुट्टी घेतली अन् कामे केली
65 वर्षीय जपानच्या 65 वर्षीय पंतप्रधान साने ताकाइची यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने जगभरात चर्चा सुरू झालीय. 20 जुलै रोजी जपानमध्ये ‘मरीन डे’ हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि सागरी राष्ट्र म्हणून जपानसाठी समुद्राचे महत्त्व अधोरेखित केले जाते. या दिवशी ताकाइची यांनी एक्सवर एक खूप पोस्ट लिहिली. खूप दिवसांनी मला सलग पाच तास झोप मिळाली. बराच काळ प्रलंबित असलेले इस्त्री आणि शिवणकामाचे काम त्या पूर्ण करू शकल्या, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर 0 ते 3 तास झोपणे ही माझ्यासाठी सामान्य गोष्ट झाली आहे. त्यामुळे उद्यापासून पुन्हा पूर्ण ताकदीने काम करू शकेन, असे पंतप्रधान यांनी म्हटलंय.


जपानमधील वर्किंग कल्चर पुन्हा चर्चेत

त्यानंतर जपानमधील वर्किंग कल्चर पुन्हा चर्चेत आलंय. या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झालीय. अनेकांनी जपानमधील अतिशय कठोर कामाच्या संस्कृतीकडे लक्ष वेधले. ताकाइची यांनी यापूर्वीही अशाच प्रकारची भूमिका मांडली होती. ऑक्टोबरमध्ये सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी अध्यक्षपदी निवड त्यांची निवड झाली होती. वर्क-लाईफ बॅलन्सची चर्चा मी बाजूला ठेवणार आहे. मी काम करणार, काम करणार आणि सतत काम करत राहणार. पक्षातील सदस्यांनाही “कामगार घोड्यासारखे काम करा, असे आवाहन त्यांनी केले होते.


कमी झोपेमुळे पंतप्रधानांना विरोधकांनी घेरले

पंतप्रधान यांच्या कमी झोपेचा मुद्दा आता जपानमध्ये गाजतेय. सर्वसामान्य नागरिकांबरोबर विरोधकांनी हा प्रश्न उचलून धरलाय. विरोधी पक्षाचे खासदार तोरु कुनिशिगे म्हणतात, दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. त्यांनी याची तुलना नशेत असण्याशी केली. हे राष्ट्रीय संकट व्यवस्थापनासाठी धोकादायक ठरू शकते. संसदेतील विरोधक हिरोयुकी कोनिशी यांनी थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केलय. पंतप्रधानांचे खरे काम धोरणाची दिशा ठरवणे आहे. निर्देश देणे आहे. प्रत्येक दस्तऐवज पूर्णपणे तपासणे हे त्यांचे काम नाही, असा सवाल हिरोयुकी कोनिशी यांनी केलाय.


घरगुती कामामुळे पंतप्रधानांना कमी वेळ मिळतो ?

तर लोकप्रिय कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते युइचिरो तामाकी यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. त्यांना मेहनती म्हटले. पण विश्रांती घेणे हे देखील काम आहे, असा सल्ला तामाकी यांनी दिला. तर टोकियो येथील नॅशनल ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या प्रा. योको इवामा यांच्या मते, पूर्वीचे नेते घरकामासाठी पत्नीवर अवलंबून असतं. ताकाइची स्वतःच जास्त घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यामुळे त्यांना वेळ कमी मिळतो, असे म्हटले आहे. अशी सपोर्ट सिस्टीम तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून जपानी पंतप्रधान घरगुती कामे स्वतः न करता पूर्णपणे सरकारी जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करू शकतील, असा टोलाही प्रा. योको इवामा यांनी लगावला आहे.


कमी झोप हा जपानचा मोठा प्रश्न

जपान सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारनुसार 2025 मध्ये कामाशी संबंधित आजार आणि अतिप्रमाणात कामामुळे झालेल्या मृत्यूंच्या दाव्यांची संख्या सलग चौथ्या वर्षी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. 2025 मध्ये 1,310 प्रकरणांना मान्यता देण्यात आली, त्यापैकी 145 प्रकरणे ‘करोशी’मुळे झालेल्या मृत्यू किंवा आत्महत्येची होती. करोशी मृत्यू अतिकाम करणे, झोप न घेण्यामुळे होणारे मृत्यू होय. त्यामुळे विरोधकांचा सल्ला जपान पंतप्रधान किती पाळतात हे भविष्यात कळेल.

Exit mobile version