Download App

Joe Biden : बायडन यांची युक्रेनला भेट, रशिया व चीन पाहतचं राहिले

अमेरिकेचे ( America )  राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( Joe Biden )   हे युक्रेनची ( Ukraine )  राजधानी कीव येथे दाखल झाले आहेत. सोमवार 20 फेब्रुवारी रोजी बायडन हे युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. बायडन यांचा हा पुर्वनियोजीत दौरा नव्हता. त्यांच्या युक्रेनच्या दौऱ्याची माहिती समोर आली नव्हती. ज्यावेळी ते युक्रेनच्या कीव येथे दाखल झाले तेव्हा याची माहिती सगळ्यांनी मिळाली. रशिया-युक्रेन युद्धाला 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर बायडन यांची ही  भेट महत्वाची मानली जात आहे.

रशिया व युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतरचा बायडन यांचा हा पहिला युक्रेन दौरा आहे. यावेळी बायडन हे युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की ( Volodymyr Zelenskyy ) यांच्यासोबत युक्रेनच्या काही भागात फिरताना दिसून आले. 24 फेब्रुवारी रोजी रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धाला 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्या अगोदर बायडन हे युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत.  बायडन यांच्या युक्रेन दौऱ्यामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच हा दौरा घातक ठरण्याची देखील शक्यता आहे. याचे कारण रशिया व युक्रेन यांच्यात अजूनही युद्ध सुरु आहे. अचानकपणे कधीही मिसाईल हल्ला होण्याची शक्यत असते. अशा परिस्थितीत बायडन यांच्या या दौऱ्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बायडन यांनी युक्रेनच्या भेटीवर एक ट्विट देखील केले आहे.  एक वर्षानंतर कीव उभा आहे. युक्रेन उभा आहे. लोकशाही उभी आहे. अमेरिका आणि जग युक्रेनच्या पाठीशी उभे आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बायडन यांच्या दौऱ्याने रशिया नाराज होण्याची शक्यता आहे. याचे कारण मुळात रशियाचा युक्रेनला ‘नाटो’  या संघटनेते समाविष्ट होण्यास विरोध होता. जर युक्रेन नाटो संस्थेत सहभागी झाली तर अमेरिका आपले अण्वस्त्र हे युक्रेनमध्ये ठेवू शकतो. याला विरोध म्हणूनच रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता.

दरम्यान चीन देखील रशियाला मदत करु शकतो, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने रशियावर अनेक देशांनी निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे रशियाला नवीन शस्त्र निर्माण करायला अडचणी झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीन रशियाला मदत करण्याची शक्यता आहे. एकंदरीतच बायडन यांच्या युक्रेन दौरा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे.

Tags

follow us