ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रीपला गेले होते. या दरम्यानचा एक राऊतांनी ट्विट केला आहे.
यात बावनकुळे मकाऊमध्ये मकाऊ veneshine या कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असा दावा या फोटोतून केला. इतकंच नाही तर त्यांनी तिथं तब्बल साडे तीन कोटी रुपये उडवले, असा आरोपही त्यांनी केला. यावर बावनकुळेंनी आणि भाजपच्या नेत्यांनी बराच खुलासा केला. ते तिथे जेवण्यासाठी गेलेले, राऊतांनी चुकीचा फोटो ट्विट केला वगैरे असे खुलासे केले. पण वाद शांत होताना दिसत नाही.
मकाऊमध्ये व्हेनेशियन मकाऊ हा जगातील सर्वात मोठा कॅसिनो आहे. इथे 3,400 स्लॉट मशिन्ससह 546,000 चौरस फुटांवर पसरलेले तब्बल 800 जुगाराचे टेबल आहेत. स्लॉट्स आणि टेबल गेम्ससह 41 हून अधिक कॅसिनो आणि हजारो खाजगी व्हीआयपी खोल्यांची सुविधा मकाऊमध्ये आहे. व्हेनेशियन मकाऊमध्ये 3 हजार VIP रुम्स आहेत आणि शहरातील सर्वात मोठा गेमिंग फ्लोअर आहे. इथे आशियाई लोकांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेले बॅकरेट टेबल, ब्लॅकजॅक आणि क्रेप्स हे गेम खेळण्यासाठी विशेष सोय आहे. संजय राऊत यांनी बावनकुळे याच कॅसिनोमध्ये गेले होते, असा दावा केला आहे.
सांख्यिकी आणि जनगणना सेवाच्या अहवालानुसार 2019 मध्ये मकाऊला तीन कोटी 94 लाख 6 हजार पर्यंटकांनी भेट दिली होती. या पार्श्वभूमवीर चिनी सरकारने आता या कॅसिनो गेमिंग रुमच्या पलीकडे जाऊन विविधीकरणास प्रोत्साहन दिले आहे. लास वेगासप्रमाणे इतर एक्झिबिशन्स आणि इव्हेंट आयोजित करण्याचा विचार करीत आहे. या सगळ्यामुळे येणाऱ्या काळात मकाऊला भेट देणाऱ्या पर्यंटकांची संख्या आणखी वाढणार हे निश्चित.