Francis Scott Key Bridge In US’ Baltimore Collapses After Ship Collision : जहाजाने दिलेल्या भीषण धडकेनंतर अमेरिकेतील प्रसिद्ध फ्रान्सिस स्कॉट्स ब्रिज कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर येथे ही भीषण घटना घडली आहे. या घटनेत जिवीतहानी झाल्याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी या पुलावरून वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे या घटनेत जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Fire crews believed 3 to 4 vehicles may have gone into the water https://t.co/dQAuIk0D3l
— BNO News Live (@BNODesk) March 26, 2024
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार घटनेनंतर पाण्यामध्ये तीन ते चार चारतारी वाहनं बुडाल्याचा अंदाज अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, नेकमी किती वाहने पाण्यात बुडाली आहेत याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, घटनेवेळी पुलावरून वाहनांची रेलचेल सुरू होती. त्यामुळे अनेक वाहने पाहण्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमेरिकन वेळेनुसार पहाटे दीडच्या सुमारास जहाज पुलावर आदळले. यानंतर आग लागली आणि जहाज बुडाल्याची माहिती समोर आली आहे. पुलावरील अपघातानंतर दोन्ही बाजूच्या सर्व लेन बंद करून वाहतूक बंद करण्यात आल्याचे मेरीलँड ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीने सांगितले आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.