Download App

सुदानमधील संघर्षादरम्यान 1 लाखांहून अधिक लोकांचे शेजारच्या देशांमध्ये स्थलांतर

More than 1 lakh people migrated to neighboring countries during the conflict in Sudan : आफ्रिकन देश सुदानमध्ये (Sudan) लष्करी आणि आरएसएफ या निमलष्करी गटात यादवी युध्दाची ठिणगी पडली. लष्कर आणि निमलष्करी दलातील संघर्ष (Conflict between Army and Paramilitary Forces) सध्या तरी संपेल असं वाटत नाही. कारण, तीन आठवडे झाले तरी हा रक्तरंजित संघर्ष सुरूच सतत गोळीबार सुरु आहे. क्षेपणास्त्र (Missile) डागले जात आहे. इमारती कोसळत आहेत. अशा परिस्थितीत अनेक विदेश नागरीक सुदानमधून शेजारील देशामध्ये स्थलांतरीत झाले आहेत.

गेल्या 15 एप्रिलपासून लष्कर आणि निमलष्करी पॅरा मिलिट्री फोर्समध्ये सुदानमध्ये युध्द सुरू आहे. हे रक्तरंजित युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 500 लोकं या लढ्याचे बळी ठरले आहेत. पण तरीही हा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. सुदानध्ये सुरू असलेल्या लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, अनेक जण देश सोडून शेजारील देशांमध्ये पोहोचले आहेत. युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजी (UNHCR) च्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

UNHCR अधिकारी ओल्गा सर्राडो यांनी सांगितले की, एका लाखांहून अधिक निर्वासितांनी देश सोडला आहे. हे लोक सुदानमधून शेजारच्या देशांमध्ये पळून गेले आहेत. या युद्धामुळे लोकांकडे पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

‘आधी श्रीरामाला कुलुपात बंद केलं, आता बजरंगबलीलाही’.. काँग्रेसच्या ‘त्या’ निर्णयावर मोदींचा हल्लाबोल

तीन हजार भारतीयांना बाहेर काढले.
सुदानमधील हिंसक युध्दामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. या युध्दात आतापर्यंत तब्बल शेकडो नागरिकांना आपला जीवावा मुकावे लागले. तर हजारो लोक जीव वाचवण्यासाठी सुदान सोडून अन्य देशात पळून गेले आहेत. याशिवाय अन्न, पाणी आणि वीज नसल्याने अनेकांना घरातच कैद राहावे लागत आहे. सुदानमध्ये हजारो भारतीयल नागरिक अडकले होते. त्यांनी ऑपरेशन कावेरी द्वारे सुदानमधून बाहेर काढण्यात आले. सुमारे 3 हजार भारतीयांना सरकारने सुदानमधून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

नेमका वाद काय?
सुदान देशाचे सैन्यप्रमुख जनरल अब्देल-फताह बुऱ्हान आणि आरएसएफचे या संघटनेचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दागालो हे दोघेही पूर्वाश्रमीचे चांगले सहकारी होते. सुदानमध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये अब्देल बुरहान आणि मोहम्मद दागालो या दोघांनी एकत्रितपणे लष्करी बंडाद्वारे तेथील अल्पकालीन लोकशाही उलथवून सत्ता काबीज केी होती. मात्र, आरएसएफच्या सैन्यामध्ये विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाला आहे. आपण वाटाघाटी करायला तयार नाही, असं दोघांनीही स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता ते ते एकमेकांना शरण येण्याची मागणी करत आहेत.

 

Tags

follow us